Home Breaking News मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

74
0
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती!
त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर एकही गुन्हा दाखल होत नाही, पण मराठी तरुण जर रस्त्यावर उतरला, तर त्याला रात्री ३ वाजता घरातून उचलले जाते. यावरूनच राज ठाकरेंचा सवाल आहे – हा दुजाभाव का? मराठी माणसावरच कायद्याचा धाक आणि इतरांना सवलत का?
राज ठाकरे वारंवार सांगतात की, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि राहणार आहे. पण सध्या घडत असलेल्या घटनांमुळे मुंबईतील मूळ रहिवाश्यांना गोंधळात टाकणारी स्थिती निर्माण झाली आहे. कबूतरखाना, रस्ते रोको, अनधिकृत रस्ते नमाज, वाघळ्यांची गर्दी – ही सगळी कारणं फक्त निमित्तं आहेत, पण त्यामागे एकच हेतू आहे – मुंबईवर सत्ता गाजवण्याचा!
यातून एक सामाजिक असमतोल निर्माण होतोय, ज्याची किंमत पुढच्या पिढ्यांना चुकवावी लागेल. त्यामुळे मराठी बांधवांनी आता सावध होण्याची आणि संघटित होण्याची वेळ आली आहे, असा इशारा राज ठाकरे पुन्हा देत आहेत.