चाकण – शिक्रापूर रस्त्यावर अनेक महिन्यांपासून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हते. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासनाने जाग घेतली असून आजपासून खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात असून, नागरिकांच्या एकतेमुळेच हे शक्य झाले आहे. ‘एकी हेच बळ’ या उक्तीचा प्रत्यय आज सर्वांनी घेतला.
स्थानिक ग्रामस्थांनी आणि तरुणांनी मिळून सोशल मीडियावरही या विषयावर सातत्याने पोस्ट केल्या. वारंवार पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आज सकाळपासून काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात मोठ्या खड्ड्यांवर डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण रस्त्यावर सुधारणा करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
या कार्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हे काम अधिक जलदगतीने पार पडण्याची अपेक्षा आहे.
🔹 रस्त्यावरील खड्ड्यांना अखेर उत्तर!
चाकण-शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू; नागरिकांच्या एकतेला यश