Home Breaking News मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय! MMRDA चा ₹12,000 कोटींचा स्मार्ट ट्रान्सपोर्ट व...

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय! MMRDA चा ₹12,000 कोटींचा स्मार्ट ट्रान्सपोर्ट व मेट्रो विस्तार प्रकल्प मंजूर

127
0

मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यकारी समितीच्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ₹12,000 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या 19 महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांत मेट्रो विस्तार, स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स, मल्टीमोडल इंटीग्रेशन, सिग्नलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, AFC प्रणाली यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले, “हा निर्णय केवळ मेट्रो प्रकल्पात गुंतवणुकीचा नाही, तर अधिक प्रगत, परस्परसंलग्न व बुद्धिमान महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले धोरणात्मक पाऊल आहे.”

मेट्रो लाईन 4 आणि 4A:

Larsen & Toubro Ltd. ला ₹4,788 कोटींचा एकत्रित करार मंजूर — रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, डिपो व देखभाल यासाठी.

याशिवाय ₹557.55 कोटींच्या सिव्हिल बांधकामास आणि ₹188.59 कोटींच्या बॅलेस्टलेस ट्रॅक कामासाठीही मंजुरी.

 मेट्रो लाईन 6:

IRCON International Ltd. ला वीज पुरवठा व ई&एम प्रणालीसाठी ₹668.15 कोटी.

NCC Ltd. ला रोलिंग स्टॉक व सिग्नलिंगसाठी ₹2,269.66 कोटींचा प्रकल्प.

 मल्टीमोड इंटीग्रेशन आणि स्मार्ट सिस्टीम्स:

मेट्रो लाईन 4 व 4A साठी मल्टीमोड इंटीग्रेशन – ₹535.08 कोटी, चार संयुक्त उपक्रमांमध्ये विभागणी.

AFC प्रणाली – ₹249.97 कोटी (Aurionpro Solutions Ltd.).

ओव्हरहेड वीज वितरण (लाइन 9 व 7A) – ₹118.28 कोटी (Leena Powertech-Umesh Brothers Consortium).

मेट्रो लाईन 2B साठी बॅलेस्टलेस ट्रॅक – ₹99.99 कोटी (Paras Railtech Pvt. Ltd.).

MTHL पॅकेज-4 साठी ITS व टोल व्यवस्थापन प्रणाली – ₹551.41 कोटी.

उपमुख्यमंत्री व MMRDA चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी म्हटले, “या गुंतवणुकीमुळे मुंबईच्या शहरव्यवस्थेत संपूर्ण परिवर्तन घडेल. शाश्वत, प्रवाशेंद्रित आणि मल्टीमोडल यंत्रणेला चालना देणारं हे पाऊल आहे.”

MMRDA चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले, “आपला मुख्य फोकस लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर, प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी करण्यावर आणि प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यावर आहे.”

या निर्णयामुळे मुंबईच्या नागरिकांना मेट्रोमधून अधिक जलद, सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. हे प्रकल्प केवळ वाहतूक सोयीसाठीच नव्हे, तर आर्थिक वाढ, पर्यावरणीय शाश्वतता आणि नागरी जीवनमान उंचावण्यासाठीसुद्धा मैलाचा दगड ठरणार आहेत.