Home Breaking News येरवड्यात भरधाव दुचाकीने घेतला तरुणाचा बळी; वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष महागात पडले

येरवड्यात भरधाव दुचाकीने घेतला तरुणाचा बळी; वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष महागात पडले

88
0

पुण्यातील येरवडा भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीनगर, येरवडा येथील रहिवासी निखिल खेडकर (वय ३० वर्षे) याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ०४ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को स्कूल समोरील खाऊ गल्ली, दुकान क्रमांक ०१, शास्त्रीनगर चौक येथे घडली.

पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, मयत निखिल खेडकर याने स्वतःच्या ताब्यातील दुचाकी अत्यंत भरधाव, निष्काळजी आणि अविचाराने चालवत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती एका ठिकाणी जोरात धडकली. यात निखिल गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

या घटनेबाबत येरवडा पोलीस ठाण्यात पो.स्टे. क्र. ३११/२०२५, भा.दं.वि. कलम १०६(१), २८१ व मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शामराव ससाणे आणि सहायक पोलीस निरीक्षक लामखडे (मो. नं. ९९२३८९६३८९) यांनी तपास सुरू केला आहे.

ही घटना पुण्यातील नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन न केल्यास स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही प्राण धोक्यात येऊ शकतात.

पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, हेल्मेटचा वापर करावा, गतीमर्यादा पाळावी आणि वाहतूक नियमांप्रमाणे वाहन चालवावे.