कोंढवा पोलीस स्टेशनच्या युनिट-०५ पथकाने रेकॉर्डवरील आरोपीस गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह पकडले
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कोंढवा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या युनिट-०५ पथकाने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह एक गंभीर आरोपी जेरबंद केला आहे. दि. २४ एप्रिल २०२५ रोजी, गस्तीदरम्यान पोलीस अभिलेखावर असलेल्या आरोपी मौला ऊर्फ मौलाना रसुल शेख (वय २२ वर्षे, रा. माऊली कृपा बिल्डींग, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. गोपनीय माहितीवरून कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-०५ च्या पोलीस स्टाफला गोपनीय...
पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई : झोन ४ मध्ये हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापा; १६ आरोपींवर गुन्हे दाखल, हजारोंचा ऐवज जप्त!
पुणे | पुणे शहरातील झोन ४ हद्दीमध्ये हातभट्टी दारू बनवणाऱ्या टोळ्यांवर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत १६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ₹४०,७६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त, तर २०५ लिटर गावठी दारू व २५० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. ही मोहीम पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे यांच्या आदेशाने राबवण्यात आली. विशेष तपशील...
भवानी पेठ पोलिस ठाण्याच्या कारवाईत तब्बल १९ आरोपी जेरबंद – अंमली पदार्थ, गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा
पुणे शहर पोलिसांनी भवानी पेठ परिसरात मोठी कारवाई करत तब्बल १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत विविध प्रकारचे अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४२/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. भवानी पेठ हे क्षेत्र पूर्वीपासून गुन्हेगारी, मादक पदार्थ आणि अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध मानले जात होते....
पुणे पोलिसांची दोन्ही ठिकाणी मोठी कारवाई; विमानतळ आणि भारती विद्यापीठ परिसरात११ लाखांची संपत्ती जप्त
पुणे शहरातील विमानतळ पोलीस स्थानक आणि भारती विद्यापीठ परिसरात पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या पुणे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठा यश मिळाले आहे. विमानतळ पोलीस स्थानकाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत एका...
शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर
पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...
एसटी महामंडळात जाहिरात परवाना घोटाळा उघड! आमदार शंकर जगताप यांचा विधानसभेत मुद्दा – मंत्री सरनाईक यांचे कठोर कारवाईचे संकेत
पुणे / मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) जागांवर जाहिराती लावण्यासाठी दिल्या गेलेल्या परवान्यांमध्ये मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. टेकसिद्धी अॅडव्हर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने जाहिरात परवाना देण्यात आला असून, या घोटाळ्यामुळे एसटी महामंडळाचे तब्बल ९ कोटी ६१ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा मुद्दा चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रभावीपणे...
“कोथरूड मधील ‘लोढा पेट्रोल पंपावर स्फोटामुळे घबराट, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.”
मंगळवारी दुपारी १ वाजता कोथरूड येथील महार्षी कर्वे पुतळा चौकात असलेल्या 'लोढा पेट्रोल पंप'वर स्फोट झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. या स्फोटामुळे पंपावर असलेल्या वाहनधारकांमध्ये घाईगडबड उडाली. पंप कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने संभाव्य अनर्थ टळला. दरम्यान, अग्निशामक दल आणि कोथरूड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या या पेट्रोल पंपावर स्फोटाच्या वेळी एका टँकरद्वारे पेट्रोलचा पुरवठा चालू होता. भूमिगत पेट्रोल...
महसूल, वन विभाग व पोलीस खात्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा भामटा अटकेत!
पुणे :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल, वन विभाग आणि पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली आहे. आरोपीने तब्बल २० ते ३० जणांकडून लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले असून, यामध्ये आणखी काही सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. फसवणुकीचा गोरखधंदा – आरोपीचा गुन्हेगारी प्रवास! 🔹 आरोपी महादेव बाबूराव दराडे (वय ३२, रा....
पुणे: खेडाडीतील ‘व्हाईट स्टोन स्पा’ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; व्यवस्थापकासह दोन महिलांची सुटका.
पुण्यातील खेडाडी येथील ‘व्हाईट स्टोन स्पा’ मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत स्पाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी व गुन्ह्याचा तपशील: अटक करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खेडाडी) असे आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहाजी जाधव...
*महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनाव्यात, हीच आमची भूमिका – महापौर रवि लांडगे…*
*पिंपरी - महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि अभ्यासासोबतच खेळ, कला व संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार असून महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची...










