पीएमटी बसमध्ये चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात; सोन्याचे बांगड्यांसह अटक!
पुणे | पुणे शहरात पीएमटी बसमध्ये प्रवासी महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणारा अट्टल गुन्हेगार चंद्रकांत राजू जाधव (वय ३१) याला वानवडी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून ३.५१ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात आधीपासूनच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. कारवाईचे तपशील: दिनांक ११ जुलै २०२५ रोजी वानवडी पोलिसांचे...
जागतिक थेट प्रक्षेपणातून जिल्ह्याचे वैभव अधोरेखित; क्रीडा, संस्कृती, इतिहास व आधुनिकतेचा संगम जगासमोर
पुणे : ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आज अंतिम टप्पा पूर्ण होताच ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. उत्कृष्ट नियोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा देश-विदेशातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण भारत व भारतीय उपखंडात ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर, तर युरोपसह जगातील ७० हून अधिक...
बांगलादेशातून बोलावून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची धडक कारवाई
पुणे शहरात पुन्हा एकदा मानव तस्करी व वेश्याव्यवसायातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिसांनी केलेल्या तात्काळ आणि काटेकोर कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीला अमानवी मार्गाने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निर्भय कार्यवाही करत बांगलादेशातून बोलावून मुलीला जबरदस्तीने बेंगळुरूमध्ये व नंतर पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश केला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना ऊर्फ पारुल...
३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरून सर्वसवलतींचा लाभ घ्या! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना ऑनलाईन कर भरण्याचे आवाहन!
पिंपरी, दिनांक १७ जून २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ३० जून २०२५ पूर्वी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांनी केले आहे. या तारखेपूर्वी कर भरणाऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती व सवलतीचे लाभ मिळणार आहेत. विशेषतः महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना मिळणाऱ्या १०% सूट व ३० टक्क्यांपर्यंतच्या सवलती यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून...
वाघोलीत वाहनचोरांवर पोलिसांची मोठी कारवाई; बाहेर जिल्ह्यातून येऊन चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद, तीन गुन्हे उघड
पुणे शहर व परिसरात वाढत चाललेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत दोन सराईत वाहनचोर आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन वेगवेगळे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या...
सरकारी यंत्रणेला शिस्त लावणारा निर्णय! तलाठी ते उपजिल्हाधिकारी ‘फेसॲप’ वर देणार हजेरी
महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. तलाठ्यांपासून ते थेट उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना फेसऍपद्वारे दररोज हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासनासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा करत स्पष्टपणे सांगितले की, "सरकार लाख चांगले निर्णय घेते, पण अधिकारीच जर जबाबदारीने काम करत नसतील, तर जनतेपर्यंत त्या...
भारत–श्रीलंका संबंध आणखी मजबूत! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान हरीणी अमरासुरिया यांच्यात विविध क्षेत्रांवर सकारात्मक चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान हरीणी अमरासुरिया यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि फलदायी चर्चा झाली. शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, नवोन्मेष, विकास सहकार्य तसेच दोन्ही देशांतील मच्छीमारांच्या कल्याणावर केंद्रित संवाद झाला. मोदी यांनी सांगितले की, भारत आणि श्रीलंका हे शेजारी राष्ट्र असून, परस्पर सहकार्य हे या दोन जनतेच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे....
“बनावट दागिन्यांच्या साहाय्याने लाखोंची फसवणूक — विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराफ व्यावसायिकांना लुबाडणारा भामटा अखेर जेरबंद”
पुणे : नामांकित सराफ दुकानदारांना लक्ष्य करून बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या हुषार भामट्याला पुणे विमानतळ पोलिसांनी अखेर पकडले आहे. दीर्घकाळापासून ज्वेलरी शॉप्सना चकवणारा हा आरोपी विविध शाखांमध्ये हातचलाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करून गायब होत असे. अखेर पोलिसांच्या सततच्या तपासामुळे हा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला. घटना कशी घडली? २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पी.एन.जी. ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एक ग्राहक अंगठ्या...
पुण्यात राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप समर्थकांचा संतप्त मोर्चा; रस्त्यावर उतरून व्यक्त केला रोष
पुणे | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप यांच्या समर्थकांनी आज पुण्यात जोरदार आक्रोश मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. विविध मागण्यांसह आणि अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासन आणि विरोधकांविरोधात रोष प्रकट केला. “न्याय मिळालाच पाहिजे”, “लोकशाहीचा आवाज दाबू देणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हातात...
वाडिया कॉलेजजवळ पोस्टर प्रकरणानंतर MNVS आणि ABVP मध्ये तणाव; पोलिसात प्रकरण नोंद
पुणे – सोमवारी, पुण्यातील संगमवाडी परिसरातील Nowrosjee Wadia College जवळ पोस्टर लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (MNVS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणाव निर्माण झाला. पोस्टरवर MNVS, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) आणि आंबेडकरी विद्यार्थी संघटना (ASA) यांच्या बहिष्काराची मागणी होती. घटनेनुसार, MNVS कार्यकर्त्यांनी ABVP कार्यालयावर धडक दिली आणि कार्यालयाचे गेट लॉक केले. MNVS सदस्यांनी आत असलेल्या व्यक्तींना बाहेर...










