महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन! पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पुणे, ३० जानेवारी २०२५ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.आ. मोहनदादा जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना...






