सामाजिक

Home सामाजिक Page 166

चार वर्षांनंतरही वाजपेयी मेडिकल कॉलेजवर मान्यतेची टांगती तलवार – एनएमसी आणि एमयूएचएसची नोटीस पाठवून कारवाईची शक्यता!

0

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय गेली चार वर्षे कार्यरत असूनही, अद्यापही वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा आणि अध्यापन कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) या दोन प्रमुख संस्थांनी कॉलेजला नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह: २०२१-२२ मध्ये प्रथम तुकडीचा प्रवेश...

पोलीस रेकॉर्डवरील ‘चोर राजा’ गजाआड; ८ घरफोडी गुन्ह्यांचा पर्दाफाश! सोनारालाही अटक

0

पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारीच्या साखळीत मोठा खंड पडला असून, 'चोर राजा' म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपुल या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीकडून तब्बल ८ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सोनारालाही अखेर अटक करण्यात आली आहे. ही धडाकेबाज कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली आहे. मा....

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! आठ लाखांच्या कपड्यांची चोरी करणारा आरोपी जेरबंद, ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या अत्यंत कसोशीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईतून कल्याणीनगर येथील जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणारा आरोपी गणपत डांगी याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईने परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.  बातमीदाऱ्याच्या माहितीतून सापडला धागा दि. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकातील श्रेणी...

“पीसीयू”चा विक्रमी टप्पा — यूजीसी-एचआरडीसीसोबत सामंजस्य कराराने उच्च शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श!

0

पिंपरी चिंचवड | उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि जलद अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पुढे जात पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) अवघ्या दोन वर्षांत असा विकास साधला आहे, जो इतर अनेक विद्यापीठांना साध्य करण्यासाठी दोन दशके लागली. याच प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पीसीयू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी) तसेच मानवी संसाधन विकास केंद्र...

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया; निवडणुकीसाठी उत्साहात कार्यकर्ते

0

नागपूर :– आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते आज स्थानिक कार्यालयात एकत्रित झाले होते, जिथे त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या प्रक्रियेदरम्यान, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उमेदवारांचे समर्पण स्पष्टपणे दिसून आले. अनेक स्थानिक नेते आणि समर्थक यांनी आपल्या उमेदवारांना शुभेच्छा देताना फोटो घेतले, ज्यामुळे...

मतमोजणीवर रुपाली ठोंबरे ताई यांचा बहिष्कार; ‘मतचोर’चा आरोप करत भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी, केंद्रावर तणावाचे वातावरण

0

मतमोजणीच्या दिवशीच राजकीय वातावरण तापले असून उमेदवार रुपाली ठोंबरे ताई यांनी थेट मतमोजणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. “मतचोर”चा आरोप करत त्यांनी मतमोजणी केंद्रावर भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. मतमोजणीदरम्यान गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे ताई यांनी आपले प्रतिनिधी...

थकबाकीदारांनो सावधान! पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली जप्ती कारवाई

0

पिंपरी, दि. २१ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून २१ जानेवारी २०२६ पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व कर आकारणी व कर...

बकरी ईद सणासाठी परिमंडळ ५ मध्ये महत्त्वपूर्ण समन्वय बैठक; मौलाना, ट्रस्टी, कुरेशी आणि प्रशासनाची उपस्थिती

0

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ४.३० ते ५.३० दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, पुणे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम तसेच स्थानिक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन आगामी बकरी ईद सणाचे शांततेत आणि...

नालासोपाऱ्यात पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून बिल्डरचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय; चौकशीची मागणी तीव्र

0

नालासोपारा (जि. पालघर) – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, जयप्रकाश (JP) चौहान या स्थानिक बिल्डरने पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौहान यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकारी – शाम शिंदे आणि...

‘स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’ – आमदार अमित गोरखे

0

पुणे : 'आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा ‘स्व’ ओळखून, ध्येय निश्चित करून यशाकडे वाटचाल करावी,' असे प्रेरणादायी आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर...

Copyright ©