सामाजिक

Home सामाजिक Page 15

कोंढव्यातील स्पा सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, स्पा मॅनेजर महिलेला अटक

0

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ पीडित महिलांची सुटका केली असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या पथकाने केली. दि. ०७ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कोंढवा येथील...

सहकारी बँकिंग क्षेत्राला डिजिटल सुरक्षेचे कवच; अत्याधुनिक एसओसीसह विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ

0

सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सायबर सुरक्षा, डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित व सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध अत्याधुनिक डिजिटल सेवांचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या डिजिटल सेवांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरी सहकारी बँकांना बदलत्या डिजिटल युगातील सायबर धोके,...

“खेळाडूंचा आत्मविश्वास आणि जिद्दच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

देहरादून, ३० जानेवारी २०२५ – भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज देहरादूनमध्ये भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. विविध राज्यांतील हजारो खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य सादर करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. "खेळाडूंच्या जिद्दीमुळे देशाचा अभिमान उंचावतो" – पंतप्रधान मोदी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार...

पिंपरी चिंचवडमध्ये १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा – १२ ते २३ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा रंगणार थरार

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा १२ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार...

सावलीच्या छायेतून लोकशाहीकडे वाटचाल!

0

पिंपरी : कोणाची आयुष्याच्या प्रवासात नाती दूरावली, तर कोणी परिस्थितीच्या ओघात एकाकी पडलेला… कोणाच्या नात्यांची ऊब हरवलेली, तर कोणाचा ओळखींचा आधार तुटलेला... समाजातील अशा निराधारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येणाऱ्या “सावली निवारा केंद्रा”मध्ये मायेच्या छायेखाली पुन्हा जगण्याची उमेद फुलू लागली आहे. येथे निवारा मिळतोच; पण त्याहून अधिक मिळते ते माणूस म्हणून...

तुळशीबाग मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

पुणे शहरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रांग वाद्य पथक, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम पार पडणार...

हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!

0

पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे. हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड...

वॉर्ड क्र. २०१ मध्ये शिवसेनेचा प्रचार शिगेला; रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

0

आज वॉर्ड क्र. २०१ मधील शिवसेना उमेदवार रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि मा. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण वॉर्डात राजकीय वातावरण तापले असून शिवसैनिकांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. उद्घाटनप्रसंगी परिसरातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी...

ढायरीतील निकृष्ट दर्जाच्या रस्ता दुरुस्तीवर महापालिकेचा दणका; ठेकेदारावर १० लाखांचा दंड, नव्याने काम करण्याचे आदेश

0

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकल्यानंतर करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ता दुरुस्तीप्रकरणी पुणे महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने ठेकेदाराच्या खर्चातून दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ढायरी...

“सावित्री कलियुगातली” – २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

0

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे परंपरा जपत, जुन्या-नव्या विचारांची सांगड घालत मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारे चित्रपट निर्माण करणे. याच परंपरेत भर घालणारा, नात्यांचा अर्थ उलगडणारा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारा “सावित्री कलियुगातली” हा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात वटसावित्रीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो. सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवणाऱ्या सावित्रीची...

Copyright ©