मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात जोरदार पाऊस; पालघरसाठी रेड अलर्ट! | हवामान विभागाचा इशारा गंभीर
मुंबई | २६ जुलै २०२५:- मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी दिवसभरात आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तासापर्यंत जाऊ शकतो. पावसाचा डेटा - मुंबईसह...
पुणे हडपसर पोलिसांची धडाडी! २९.७६ लाखांची सायबर फसवणूक रोखली; नागरिकांना मिळाले पैसे परत
पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी सोशल मिडिया अॅप्सच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, हडपसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे तब्बल ₹२९,७६,८२२/- ची फसवणूक झालेली रक्कम तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. काय आहे प्रकरण? सायबर चोरट्यांनी नागरिकांशी संपर्क साधून,...
देशभक्तीचा महायोद्धा हरपला – ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश – 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला' मुंबई, 4 एप्रिल – भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीची ओळख देणारे, "भारतकुमार" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, "चित्रपटसृष्टीतून देशभक्ती आणि भारतीय संस्कृती जनमानसावर ठसवणाऱ्या...
सुधा मूर्ती यांनी सांगितला सरलाचा प्रेरणादायी प्रवास – वैयक्तिक दुःखावर मात करत स्वावलंबनाची वाटचाल!
नवी दिल्ली – सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी GDP MyGov ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सरलाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. सरलाने आपल्या जीवनात मोठे वैयक्तिक दुःख सहन केले, मात्र सरकारी योजनांच्या मदतीने ती नव्या उमेदीने उभी राहिली. तिची ही संघर्षगाथा इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. वैयक्तिक दुःखावर मात करून स्वावलंबनाचा प्रवास सरला ही एक सर्वसामान्य स्त्री. मात्र नियतीच्या आघातांनी तिचे आयुष्य...
“सीआयएसएफमध्ये देशातील पहिले ‘सर्व महिला बटालियन’ स्थापन; १००० हून अधिक महिला जवानांची नियुक्ती”.
नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२४ - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सर्वप्रथम 'सर्व महिला बटालियन' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी या बटालियनसाठी १०२५ महिला जवानांची भरती करण्यास मान्यता दिली असून, या विशेष महिला बटालियनचे नेतृत्व वरिष्ठ कमांडंट रँक अधिकारी करतील. महिला बटालियनद्वारे देशाच्या सुरक्षेतील योगदानाला नवी ओळख ही महिला बटालियन तयार करण्यामागे गृह मंत्री अमित शाह यांच्या...
“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार
मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खराडीमधील ‘ड्रग्ज पार्टी’वर छापा – ७ जण ताब्यात, ४१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
खराडी परिसरात एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज आणि हुक्का पार्टीवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, कोकेन, गांजा, महागडे मोबाईल, हुक्का सेट, दारू व चारचाकी वाहने असा मिळून सुमारे ₹४१.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक २७ जुलै २०२५...
इंस्टाग्रामवर नाव बदलून हिंदू मुलीशी दोस्ती; मोहम्मद समद पोलिसांच्या जाळ्यात अडकला, मुलीची शिताफीने कारवाई
उत्तर प्रदेश : इंस्टाग्रामवर 'राज कुमार' हे खोटे नाव घेऊन हिंदू मुलीशी मैत्री करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहम्मद समदला पोलिसांनी अटक केली आहे. समद हा आपल्या मूळ ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला फसवू पाहत होता. मात्र, संबंधित मुलीने सूज्ञपणे आणि शिताफीने कारवाई करत पोलिसांना पूर्वसूचना दिली होती, आणि समद मुलीला भेटण्यासाठी शाळेजवळ आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार लव्ह...
विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई!
पुणे – शहरात अवैध शस्त्रवहनाला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली असून एका अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी घडली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली...
पावसाचा कहर! दिवे घाटात ढगफुटी, पिंपरीत वाहने वाहून गेली, पुणे शहरात शासकीय इमारती जलमय
पुणे | १४ जून २०२५ – राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे प्रचंड पाणी साचून निसर्ग रौद्र रूपात अवतरला. दिवे घाटात मुसळधार पावसामुळे ओढे, धबधबे आणि पाण्याचे प्रवाह एकदम ओसंडून वाहू लागले. काही धबधब्यांनी इतकं रौद्र रूप धारण केलं की...











