सामाजिक

Home सामाजिक Page 26

पुणे हवामान अपडेट: घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट, रायगडसाठी रेड अलर्ट; पुढील आठवडाभर पावसाचा इशारा!

0

पुणे (दि. १६ जून २०२५): शहरात मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असतानाच, आता हवामान खात्याने अधिक तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. भारत हवामान विभागाने (IMD) पुणे शहराच्या घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि शेजारील रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन चक्रीवादळांचा परिणाम; महाराष्ट्रावर होणार...

पुण्यात ४२० बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू; वाहनधारकांना १५ दिवसांची अंतिम संधी

0

पुणे – वाहतूक शाखा, पुणे शहर अंतर्गत विविध वाहतूक विभागांमध्ये दीर्घकाळापासून विनधनी आणि बेवारस स्थितीत असलेल्या तब्बल ४२० वाहनांची लिलाव प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार व पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. वाहतूक विभागाच्या अधिकृत पत्रकानुसार, पुणे शहरातील डेक्कन, शिवाजीनगर, खडक, समर्थ, भारती विद्यापीठ, सहकारनगर, लष्कर,...

गणरायाला भावपूर्ण निरोप; पुढील वर्षीच्या आगमनाची उत्सुकता सुरूच

0

मुंबई | दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर आज गणेशोत्सवाची सांगता झाली. “निरोप घेण्याची वेळ आली, आता पुढल्या वर्षीच्या भेटीची आस लागली…” अशा भावनिक स्वरात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!” या गजराने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला. श्रद्धा आणि भक्तीचा मिलाफदहा दिवस घराघरांत पूजाअर्चा, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण मंगलमय झाले होते. आजच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांनी अश्रूंनी...

परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मोठा प्रतिसाद!

0

पुणे : महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. ११६ दुचाकींचा भव्य ताफा – २३२ महिला...

पुणे पोलिसांची धडक मोहीम! हातभट्टी दारू आणि अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई; १४ गुन्हे दाखल, हजारो लिटर दारू जप्त

0

पुणे शहरात पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू धंदे करणाऱ्यांना जोरदार हादरा दिला आहे. परिमंडळ ४ मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील डोंगराळ आणि नदी परिसरात लपूनछपून हातभट्टी दारू तयार करून तिची विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात मासरेड राबवून १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक १९ जुलै २०२५ रोजी शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत एकूण १४ आरोपींवर...

विधिसंघर्षित बालकांकडून पुण्यातील घरफोड्यांचा पर्दाफाश! हडपसर पोलिसांची चोख कामगिरी, साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

हडपसर, पुणे – पुणे शहरातील हडपसर परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घरफोडींचा तपास करताना हडपसर पोलिसांनी जबरदस्त कारवाई केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत ३,८५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष बाब म्हणजे हे गुन्हे विधिसंघर्षित बालकांकडून झाले असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ....

अवैध गोमांस विक्री केंद्रावर छापा — मोठ्या प्रमाणावर गोमांस हस्तगत, सहा जणांची संघटित मोहीम

0

शिरूर तालुक्यात अवैध गोमांस विक्रीबाबत मिळालेल्या माहितीवरून बजरंग दलाच्या गोरक्षकांनी आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, हे जाळे मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  FIR तपशील (NCRB फॉर्मनुसार): जिल्हा: पुणे ग्रामीण पोलीस ठाणे: शिरूर FIR क्रमांक: 0872/2025 दिनांक व वेळ: 07/12/2025, रात्री 21:11 गुन्हा...

पिंपरी चिंचवड शहरातील अलिशा पठाण ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेच्या शर्यतीत सामील

0

पिंपरी चिंचवड :  मिस ग्रँड इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर जाणे हे अनेक मुलींची स्वप्ने असतात, याच स्वप्नांचा पाठपुरावा पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण यांनी केला आहे.  सामान्य घरातून आलेली मास्टर्स डिग्री मिळविणारी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या मार्गावर असलेली इंडियाच्या मंचावरून महाराष्ट्राचे नाही तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी युवती ठरली आहे. पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण हि  नुकतीच...

विश्रांतवाडीत पिस्तुलचा धाक दाखवणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात! विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त

0

पुणे | विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  घटनेचा सविस्तर तपशील: दि. 10 जुलै रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना पो. अं. संपत...

ठाणे-बेलापूर महामार्गावरील भीषण अपघात : बसच्या धडकेत दोन पादचारी ठार, तीन जण जखमी.

0

रबाळे, ३० ऑक्टोबर २०२४ : ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे परिसरात एका खासगी बसने नियंत्रण सुटल्याने दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृत पादचाऱ्यांची ओळख विजयमाला साळोबा सुतार (४०) आणि अनीश देव नारायण चौहान (४०) अशी आहे. या अपघातानंतर बस चालक रबी दीपु देब (२३) याला रबाळे MIDC पोलिसांनी दोषी ठरवत त्याच्यावर गुन्हा दाखल...

Copyright ©