पुणे मेट्रोच्या वनाज-रामवाडी मार्गाची पूर्ण कार्यक्षमता; येरवडा स्टेशनचे उद्घाटन आज.
पुणे: पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील येरवडा मेट्रो स्टेशनचे व्यावसायिक संचालन बुधवारी सुरू होत आहे. या स्टेशनची वास्तू ऐतिहासिक दांडी मार्चने प्रेरित असून, ती भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. हे स्टेशन केवळ एक महत्त्वपूर्ण परिवहन दुवा म्हणून काम करणार नाही, तर आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देईल. आता वनाज ते रामवाडी मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होणार असून,...
*पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिन प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…*
समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ....
मुंबईत आत्महत्येचे सत्र सुरू – पोलीस शिपायासह दोन युवकांनी संपवला जीव!
मुंबईत पुन्हा आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. गोरेगावमध्ये एका ३७ वर्षीय पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसेच, दुसऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, एका पोलीस अधिकाऱ्याच्या २० वर्षीय मुलाने आणि एका २४ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. या तीनही घटनांनी मुंबईकरांना हादरवून सोडले आहे. पोलीस शिपायाने राहत्या घरी घेतला गळफास पीटीआयच्या अहवालानुसार, मुंबई पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस शिपाई...
माधुरीला परत आणा! कोल्हापुरात जनतेचा अभूतपूर्व उद्रेक; ३० हजार लोकांचे पायी आंदोलन, न्यायालयीन निर्णयावर संताप
"ही कोल्हापूरची माती आहे, इथे माणुसकी अजूनही जिवंत आहे" – असा भावनिक नारा देत कोल्हापुरातील हजारो नागरिकांनी हत्तीण माधुरी उर्फ महादेवी हिच्या परतीसाठी रविवारी (३ ऑगस्ट २०२५) ऐतिहासिक मौनमोर्चा काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ३० हजारांहून अधिक नागरिकांनी ४५ किमीचा पायी प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिले. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील...
मेट्रोमुळे कोंढव्याला नवी गती; शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
पुणे | कोंढवा परिसराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याला पुणे शहराच्या इतर भागांशी जोडण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कात्रज–कोंढवा मार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत वाढवणे आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाशी जोडणारी मेट्रो लाईन कोंढवा परिसराशी संलग्न...
हिंजवडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय
मुंबई/पुणे – 10 जुलै 2025 : पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य केंद्र असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे हजारो नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या समस्येच्या कायमस्वरूपी समाधानासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हिंजवडी ते वाकड –...
उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, दि.१३ मार्च २०२५:- पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. उष्णतेपासून बचावासाठी खालील उपाययोजना कराव्यात काय करावे व काय करू नये उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून...
मनसेकडून मोठी घोषणा : मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली
मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेतला असून, मुंबई उपशहर अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण मुंबई उपशहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर करताना राजसाहेब ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या संघटनात्मक कामाचा, जनतेशी...
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 10 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम...
उल्हासनगर डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेचा मोठा छापा! २४ बारबालांसह ७ ग्राहक आणि ६ कर्मचाऱ्यांना अटक, शहरात खळबळ
उल्हासनगर (ठाणे) – उल्हासनगर शहरातील एका प्रसिद्ध डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा धडक कारवाई केली. या कारवाईत २४ बारबाला, ७ ग्राहक आणि ६ बार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. गुप्त माहितीवरून मोठी धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने डान्सबारवर नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या...











