महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पिंपरी-चिंचवडकरांचा ठाम विश्वास – भाजपचा ऐतिहासिक विजय, ८४ जागांवर घवघवीत यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत ८४ जागांवर विजय मिळवला आहे. या महाविजयातून पिंपरी-चिंचवडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. शहराच्या विकासासाठी स्थिर, सक्षम आणि पारदर्शक प्रशासनाची गरज ओळखून नागरिकांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या दणदणीत यशाबद्दल...
नशेतल्या टुरिस्ट कॅबने चहा टपरीवर केले थेट जोरदार धडक! १२ जण जखमी, चालक आणि सहप्रवासी पोलिस कोठडीत
पुणे – शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात असलेल्या भवे स्कूलजवळील नारायण साई टी स्टॉल परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता एक गंभीर अपघात घडला. एका टुरिस्ट कॅबचा चालक आणि त्याचा सहप्रवासी, हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी वाहनावरील ताबा गमावून थेट चहा टपरीवर आणि तिथे उभ्या असलेल्या नागरिकांवर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुमारे...
पुण्यातून फरार झालेला विश्वासघातकी चालक अखेर गजाआड! सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, ३० जुलै २०२५: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विश्वासघातकी चालकाने मालकाच्या कामासाठी आणलेली पगाराची रक्कम चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी चाणाक्ष तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ठाणे) याला अखेर ठाण्यातून अटक केली आहे. काय घडलं होतं? फिर्यादीच्या गाडीतून मजुरांचा पगार देण्यासाठी १५ लाखांहून अधिक रोख रक्कम...
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला. यावेळी उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली....
पुणे जिल्ह्यात दमदार प्री-मॉनसून पावसाची नोंद; लवळे, नारायणगावात सर्वाधिक सरी, सह्याद्री घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता
पुणे :- पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मंगळवारी प्री-मॉनसून पावसाने जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, लवळे येथे सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० दरम्यान सर्वाधिक ४८.५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर शिवाजीनगर (१८.७ मिमी), पाषाण (१७.१ मिमी), आणि हडपसर (२५.५ मिमी एकूण) या भागातही चांगला पाऊस झाला. महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडेच; मात्र पुणे जिल्ह्यात मुसळधार सरी महाराष्ट्रातील अन्य...
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त
पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली...
विधिसंघर्षित बालकांकडून पुण्यातील घरफोड्यांचा पर्दाफाश! हडपसर पोलिसांची चोख कामगिरी, साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
हडपसर, पुणे – पुणे शहरातील हडपसर परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घरफोडींचा तपास करताना हडपसर पोलिसांनी जबरदस्त कारवाई केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत ३,८५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष बाब म्हणजे हे गुन्हे विधिसंघर्षित बालकांकडून झाले असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ....
मुंबईत पावसाचा कहर! १० सेकंदांत टेकडीवरील घरे आणि भिंती कोसळल्या; सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई | २३ जुलै २०२५ – मुंबईत संततधार पावसामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. शहरातील एका टेकडीवर उभारण्यात आलेली घरे आणि संरक्षक भिंती अवघ्या १० सेकंदांत जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली आहे. मात्र ही...
हरवलेल्या माऊलीला दिला दिलासा! पोलिसांच्या सतर्कतेमुळे ५५ वर्षीय महिला सुखरूप पोहोचली दिंडीमालकांच्या ताब्यात
वारीतील गर्दीत हरवलेल्या एका वरिष्ठ महिलेला शोधून काढून सुखरूप तिच्या दिंडीमालकांकडे सोपवण्याचा माणुसकीचा आणि तत्परतेचा आदर्श पुणे पोलीस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. ठिकाण: मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्द, पुणे वारीचा उत्साह आणि भक्तिरस भरलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे शहरातून सुरू असताना, एक ५५ वर्षीय महिला – सीता दत्तात्रय ठाकूर, रा. दसखार, भटआळी – या वाऱ्याच्या वेगासारख्या चालणाऱ्या दिंडीत...
आशा भोसले आणि नात झनाई भोसले एका खास कार्यक्रमात एकत्र दिसल्या; तीन पिढ्यांचा सुरेल वारसा पुन्हा चर्चेत
मुंबई – सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आपल्या सौंदर्य, सौजन्य आणि स्वरांनी जगभर गाजलेल्या आहेत. अलीकडेच त्या त्यांच्या गुणी नात झनाई भोसले हिच्यासोबत एका खास कार्यक्रमात उपस्थित होत्या. या दोघींनी एकत्रितपणे कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले आणि माध्यमांमध्येही हे दृश्य चर्चेचा विषय ठरले. झनाई भोसले – गायनात नव्या पिढीचा चेहरा: झनाई भोसले ही स्वतः एक उदयोन्मुख गायिका आणि परफॉर्मर आहे. ती...







