महाराष्ट्र
एक वर्ष जुनी बोलेरो पिकअप चोरी उघडकीस! वाघोली पोलिसांच्या सतर्क कारवाईत सराईत आरोपी जेरबंद
पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने एक मोठी कामगिरी करत लोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोचा छडा लावला आहे. या कारवाईत रामनगर, वारजे माळवाडी येथील रहिवासी सुनिल आण्णा कांबळे (वय ४०) या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटना घडली कशी? दि. १९ जून २०२५ रोजी, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या...
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हप्ता जमा होणार लवकरच; थकीत रकमेचाही निपटारा सुरू.
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा दिलासा ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा चर्चेत आली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. आता या योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महिला लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदत: महायुती सरकारने जुलै महिन्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. या योजनेत...
संविधान भवनात बाबासाहेबांना सन्मानाची मानवंदना; 135 वी जयंती उत्साहात साजरी
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात अभूतपूर्व उत्साह आणि आदरभाव व्यक्त करण्यात आला. राजधानी दिल्लीत संविधान भवनात विशेष कार्यक्रम आयोजित करून संविधानाच्या शिल्पकारांना मानाचा मुजरा करण्यात आला. विविध राज्यांत देखील बाबासाहेबांना अभिवादन करणारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संघर्ष, आणि समाजासाठीचे योगदान हे आजच्या काळातही प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी दिलेले संविधान...
AAP आमदार नरेश बल्याणला खंडणीच्या आरोपाखाली अटक: दिल्ली पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा धडक कारवाई.
गुन्ह्यांचा जाळा उघडकीस: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी AAP आमदार नरेश बल्याणला खंडणी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागाच्या आरोपाखाली अटक केली. बल्याणने कुख्यात गँगस्टर कपिल सांगवान (नंदू) सोबत संगनमत करून खंडणी वसुलीच्या घटनांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे. सांगवानची गुन्हेगारी पार्श्वभूमी: कपिल सांगवानवर अनेक गोळीबार आणि खंडणीच्या घटनांमध्ये सहभागाचे आरोप आहेत. सांगवान सध्या UK मध्ये पळून असून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात...
पुण्यात शाळेजवळील पानटपऱ्यांवर कारवाई – हडपसर पोलिसांची धडक मोहीम!
पुणे – शाळेच्या १०० मीटर परिसरात असलेल्या बेकायदेशीर पानटपऱ्यांवर हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आज दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी ही धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तीन पानटपऱ्या हटविण्यात आल्या असून, त्यांच्या चालकांविरोधात कोफ्ता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मगरपट्टा परिसरातील कारवाई हडपसर पोलिसांना परिसरातील स्थानिकांकडून तक्रारी मिळत होत्या की, कड वस्ती, मगरपट्टा...
बिबवेवाडीत बिअर बारमध्ये वाद, मित्रावर जीवघेणा हल्ला!
पुणे, बिबवेवाडी – बिबवेवाडी येथील एस.के. बार, स्वामी विवेकानंद रोड येथे २१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री १२:०१ ते १२:४५ दरम्यान एका तरुणावर गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय व्यक्तीने आपल्या मित्रांसोबत बिअर पित असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तक्रारदार आणि त्याचा मित्र असे नमूद इसमांसोबत बसले असताना, बिल देण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. या वादात...
दुनियादारी परिवाराचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ स्वाती साठे यांना प्रदान !
पुणे: शहरातील दुनियादारी परिवार वतीने दरवर्षी दिला जाणारा 'एक्सलन्स अवॉर्ड' श्रीमती स्वाती साठे पोलीस उपमहानिरीक्षक, यांना त्यांच्या समाजसेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. दुनियादारी या संस्थेची स्थापना 2014 साली करण्यात आली. सुरुवातीला केवळ पाच सदस्य घेऊन या समूहाची स्थापना झाली. कालांतराने विविध विषयांवरील समुह तयार झाले, व्यवसाय ,सुरमयी लेखन, इत्यादी समूह तयार झाले. आज या परिवाराची एक हजार...
सांगवीत महिलेला हातोड्याने मारहाण करून सोनसाखळी लंपास; अनोळखी आरोपी फरार.
पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात एका अनोळखी चोरट्याने महिलेच्या डोक्यावर हातोड्याने वार करत तिची सोनसाखळी चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सांगवीतील महाराष्ट्र बँक चौकात सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचा तपशील: प्राप्त माहितीनुसार, एका 50 वर्षीय महिलेच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिची सोनसाखळी चोरून नेणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा दुचाकीवरून आला होता आणि...
निवडणूक काळात हडपसर पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, दहशत अथवा गुन्हेगारी घटना घडू नयेत यासाठी शहरभर नाकाबंदी, संशयितांची तपासणी व सातत्यपूर्ण गस्त सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईत रेकॉर्डवरील...
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार
पिंपरी, दि. १६ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य संदीप कस्पटे,बाबासाहेब त्रिभुवन,नगरसदस्या आणि अधिकारी,कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले. यावेळी महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात...















