Breaking News
अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.’कडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी ₹5,51,101 ची देणगी; समाजकारणाची अनोखी मिसाल!
अमरावती येथे एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग घडला, जिथे ‘अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’च्या वतीने व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भारतप्रकाश खजांची, श्रेणिक बोथरा, शीतलकुमार लुणावत, शिवाजी देठे आणि अनिल उगले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी ₹5,51,101 ची देणगी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये सुपूर्द केली. अतिवृष्टीमुळे नुकत्याच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला आर्थिक मदतीची...
संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनातून थेट शेतकऱ्याच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि टिकाऊ शेतीत परिवर्तन घडवतील अशा प्रकारचे निष्कर्ष द्यावेत, संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल असून हीच खरी मोजमापाची कसोटी आहे, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास...
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात आले तर शुभंकर प्रदर्शित करण्यात आले. या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युसीआय (Union Cycliste International) आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याची माहिती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान (नॅशनल मनुफॅक्चरिंग मिशन) सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही 'राज्य उत्पादन अभियान' सुरू करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात जागतिक दर्जाची 'ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट' स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले. नीती आयोगाच्यावतीने यशदा येथे 'रिइमॅजनिंग मॅन्युफॅक्चरिंग : इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग' या विषयावर आयोजित 'द...
“शेतकऱ्यांची खरी मदत गरजूंनाच मिळावी!” — बच्चू कडूंचं मोठं विधान; कर्जमाफीसाठी लढा अधिक तीव्र होणार!
नागपूर / मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तापलेलं वातावरण दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. यालयाने आंदोलनाचं ठिकाण रिकामं करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी “आम्हाला अटक करा!” असं म्हणत पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवला होता. मात्र रस्त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट...
महिला विश्वचषक उपांत्य सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया — अंतिम फेरीचं तिकीट कोणाच्या नशिबात
नवी मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना आज (गुरुवार, दि. ३०) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना दुपारी ३:०० वाजता सुरू होणार असून नाणेफेक दुपारी २:३० वाजता पार पडेल. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना म्हणजे ‘मिनी फायनल’च आहे. भारतीय महिला संघाला या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करावा...
अंबरनाथमध्ये थरार! प्रसिद्ध महिला डॉक्टरवर पतीकडून खलबत्त्याने जीवघेणा हल्ला — केवळ “नाइस डीपी” मेसेजमुळे पेटला होता राग!
अंबरनाथ | शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. अंबरनाथ पश्चिमेतील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्या डोक्यात त्यांच्या पतीने खलबत्त्याने जोरदार हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शिंदे या आपल्या पती विश्वंभर शिंदे आणि दोन मुलांसह मोहन सबर्बिया...
नागरिकांच्या प्रेमाचे देणे! महेश लांडगे दादांचा भावनिक संवाद — “पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या विश्वासाचा मी सदैव ऋणी राहीन”
पिंपरी चिंचवड | लोकांशी संवाद साधणे हे केवळ जनसंपर्क नाही, तर हृदयातील एक नातं आहे, असे भावनिक शब्द भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी आपल्या नागरिकांसमोर व्यक्त केले. गेल्या दहा वर्षांत नागरिकांनी दाखवलेले प्रेम, विश्वास आणि साथ हीच त्यांची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. महेश लांडगे म्हणाले, “गेल्या दशकभरात मी माझ्या पालकांच्या संस्कारांनी आणि नागरिकांच्या विश्वासाने घडलेलो आहे. त्यांच्या प्रेमाची...
थरारक फसवणूक प्रकरण! थायलंडमार्गे कम्बोडियात विक्री — स्कॅमिंग कामासाठी परदेशात पाठविलेल्या महिला इंजिनिअरची सुटका; अविनाश उढाणवर गुन्हा दाखल
औरंगाबाद | परदेशात नोकरीच्या आश्वासनाने एका तरुणीला थायलंडमार्गे कम्बोडियात विक्री करून स्कॅमिंग कामासाठी भाग पाडण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी कंपनी मालक अविनाश रामभाऊ उढाण याच्याविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय घटस्फोटीत महिला ही इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून २०२१ मध्ये ती शहरातील लेडीज होस्टेलमध्ये राहून अॅग्रो केअर मशिनरीज या कंपनीत नोकरी करत होती....
भारत-चीन सीमावादावर सकारात्मक प्रगती! २३व्या सैन्य कमांडर बैठकीत दोन्ही देशांमध्ये सहमती — सीमेजवळ शांती व स्थैर्य राखण्यावर भर
नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी आयोजित कोर कमांडर स्तरावरील २३वी बैठक बुधवारी सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सीमावर्ती भागात शांती, स्थैर्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यावर भर दिला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून उर्वरित विवादित मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. पूर्व लडाखसह इतर संवेदनशील भागांतील प्रश्न सोडवण्यासाठी...





