Breaking News
मतदार यादीवरील हरकती व सूचनांची प्रक्रिया चोखपणे पार पाडा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे निर्देश
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात करण्यात आला आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पीक अवर दरम्यान टोल दरवाढ जाहीर – नवीन दर आणि वेळापत्रक वाचा!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून पीक अवर म्हणजेच वर्दळीच्या वेळेत टोल दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा निर्णय घेतला असून, द्रुतगती मार्गावरील ट्रॅफिक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन टोल दर: जानेवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन दरांनुसार, पीक अवरमध्ये प्रवास करणाऱ्या...
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात नवी खळबळ! लोकप्रिय इन्फ्लुएंसर ‘ओरी’ ANC समोर हजर; तपासाची दिशा बदलण्याची शक्यता
मुंबईच्या मनोरंजन व सोशल मीडिया जगतात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. देशातील लोकप्रिय इन्फ्लुएंसर ओरी (Ori) बुधवारी मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेल (ANC) समोर स्वतः हजर झाले. काही दिवसांपासून त्यांचे नाव एका संभाव्य ड्रग्ज नेटवर्कशी जोडले जात असल्याने हा तपास अधिकच गतीमान झाला आहे. ओरीच्या ANC कार्यालयातील उपस्थितीनं मीडिया, चाहत्यांमध्ये आणि डिजिटल जगतात मोठी चर्चा झाली आहे. अनेक लोक ANC...
जिओस्पेशियल तंत्रज्ञानाला चालना; महाराष्ट्र शासन व BISAG-N यांच्यात सामंजस्य करार, पायाभूत विकास व योजनांच्या अंमलबजावणीत गती येणार
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील पायाभूत सुविधा विकास आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या Maharashtra Institution for Transformation (MITRA) (नियोजन विभाग) आणि Bhaskaracharya National Institute for Space Applications and Geo-informatics (BISAG-N) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे राज्यात जिओस्पेशियल (भौगोलिक माहिती प्रणाली) तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यासाठी आवश्यक धोरणे...
मुंबई रेल्वे स्थानकांवर मराठ्यांचे वादळ, प्रत्येक ठिकाणी एकच आवाज – आरक्षण हक्काचा!
मुंबई : राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे धाव घेत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली असून, डबाबंद गाड्यांमध्येही मराठ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. प्रत्येक स्थानकावर "आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच!" या घोषणांचा गजर दुमदुमत आहे. छोट्या गावांपासून ते शहरांपर्यंत, हजारो कार्यकर्ते कुटुंबांसह रेल्वेतून मोर्चाकडे रवाना होत आहेत. मुंबईतील दादर, सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मानखुर्द या प्रमुख स्थानकांवर मराठा...
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त -मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
पिंपरी, दिनांक ८ मे २०२६: पिंपरी चिंचवड शहर क्रीडा क्षेत्रात वेगाने पुढे जात असून महापौर चषकासारख्या स्पर्धांमुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. अशा स्पर्धा केवळ खेळापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर शिस्त, नेतृत्व आणि संघभावना घडविण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आपला देश क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून २०३६...
“वाघोलीत पुणे नगर महामार्गावर दुर्दैवी अपघात; ४० वर्षीय पादचारी एसटी बसच्या धडकेत जागीच ठार”
पुणे-नगर महामार्गावर एसटी बसने पादचारीला धडक दिली. या धडकेत पादचारीचा मृत्यू झाला. ही बस राजगुरुनगरहून पैठणकडे जात होती. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे वय ४१ आहे आणि त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राप्त माहितीनुसार, पादचारी पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना ही घटना घडली. त्याच वेळी राजगुरुनगरहून पैठणकडे जाणारी बस शहराकडे येत होती. पादचारी अचानक बससमोर आल्याने चालकाला बसवर नियंत्रण ठेवता...
रस्त्यामध्ये फौजी आणि वकील यांच्यात हाणामारी! हेल्मेटने केले हल्ले
शहरातील एका गर्दीच्या रस्त्यावर घडलेली धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका फौजी आणि वकील यांच्यात मध्यरस्त्यातच जोरदार भांडण झाले. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यात दोघांमध्ये झालेली तीव्र झटापट स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, फौजी भावाने संतापाच्या भरात वकीलाच्या डोक्यावर हेल्मेट जोरात आपटले, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. आजूबाजूला लोकांची गर्दी...
आमदार अमित गोरखे यांच्या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी भामा आसखेड धरणातील गाळ काढण्यासाठी जिल्हा जलसंधारण विभागाला दिले तातडीचे आदेश
पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्यासाठी आणि भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पाऊल उचलले आहे. भामा आसखेड धरणातील साचलेला गाळ काढून धरणाची मूळ साठवण क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी आमदार गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जिल्हा जलसंधारण विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे...
पुणे: घरफोडी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद, ४,६६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: पुणे शहरातील आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांतील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ४,६६,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची ओळख: आयुष संजय खरात, वय २० वर्ष, रा. सुखसागर नगर, पुणे आर्यन कैलास आगलावे, वय १९ वर्ष, रा. गोकुळनगर, पुणे चोरीतील गुन्ह्यांची उघडकीस:आंबेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार, पो. हनमंत मासाळ...











