Breaking News
दक्षता अन् सुदैवाने मोठा अनर्थ टळला! साउथ मुंबईत BEST ची डबल डेकर इलेक्ट्रिक बस पेटली, प्रवासी सुखरूप; तपास सुरू
मुंबई | मुंबईतील नेहमी गजबजलेल्या सिद्धार्थ कॉलेज सिग्नल, फोर्ट परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) यांची एक इलेक्ट्रिक डबल डेकर बस अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे. नेमकी घटना कशी घडली? सदर बस भाटिया बाग येथून बॅकबे डेपोकडे जात असताना अचानक बसच्या समोरील डाव्या...
चिंचवड विधानसभा क्षेत्रातील चिकलीत वीजपुरवठा स्थिर करण्याचे यशस्वी पाऊल! महावितरणच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांना दिलासा
भोसरी विधानसभा क्षेत्रातील चिकली येथील Jijamata Housing Society परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ त्रास देणारी वीज पुरवठ्याची समस्या अखेर सुटली आहे. शरद नगर, रोड क्र. ६ (Jijamata Housing Society) येथील नागरिकांकडून वारंवार वीज खंडित होणे आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याबाबत तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर समस्येचे समाधान करण्यात यश आले. नागरिकांच्या तक्रारींवर महावितरण विभागाने तत्काळ...
पुणेकरांना निवडणुकीच्या निकालापूर्वी झटका! सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ.
निवडणुकीनंतर इंधन दरवाढ सुरू, सीएनजीच्या दरातही झपाट्याने वाढ पुणे: विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर पुणेकरांना पहिला मोठा झटका बसला आहे. सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) दरामध्ये दोन रुपयांची वाढ जाहीर झाली असून, ही वाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी ही दरवाढ चिंता वाढवणारी ठरत आहे. नवीन दर लागू सीएनजीचा जुना दर: रु. 85 प्रति किलो नवीन दर: रु. 87...
पुणे वाहतूक विभागाचा मोठा निर्णय: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी सिंहगड रोड, धायरी, येरवडा व विश्रांतवाडी परिसरात वाहतूक बदल लागू
पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी, येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी आज वाहतूक विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे, या परिसरातून अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडत असल्याने सामान्य नागरिकांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मार्ग बदल लागू करण्यात आले आहेत. सिंहगड रोड व धायरी परिसर:आज एकूण ८६ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचे आयोजन आहे. मिरवणूक नऱ्हे, धायरी, उंबऱ्या गणपती...
नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेना नेतृत्वाशी भेट; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा
देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांची आज New Delhi येथे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सध्याच्या जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विचारविनिमय झाला. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा भारतावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन या बैठकीत चर्चा झाली. देशाच्या...
पुण्यात बनावट सोने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात – ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : युनिट ६, गुन्हे शाखा, पुणे शहराने बनावट सोन्याचे दागिने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती :दि. १८ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय...
“इंडिया मेरीटाईम वीक २०२५” — भारताच्या सागरी सामर्थ्याचे दर्शन!
मुंबई : भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रगती, तंत्रज्ञान, आणि व्यापार क्षेत्रातील नव्या संधींचा उत्सव म्हणून “इंडिया मेरीटाईम वीक २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील सागरी उद्योगातील तज्ज्ञ, उद्योजक आणि धोरणनिर्माते या आठवड्यात सहभागी होणार आहेत. या वर्षीचा मेरीटाईम वीक...
21 वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : "केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी...
“डिजिटल भारतासाठी मोठी झेप — जबलपूरमध्ये BSNL व जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सामंजस्य करार”
जबलपूर | केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज जबलपूर येथील भारत रत्न भीम राव आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम ट्रेनिंग (BRBRAITT) मध्ये डिजिटल स्किलिंग उपक्रमांना नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमांतर्गत BSNL आणि जागतिक स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या — एरिक्सन, क्वालकॉम, सिस्को आणि नोकिया — यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. डिजिटल स्किलिंगसाठी नवा टप्पाया करारामुळे भारतातील...
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...










