गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 12

हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल

0

पुणे शहरातील हडपसर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हडपसर पोलीस स्टेशनच्या सतर्क तपास पथकाने केवळ ३ विधिसंघर्षित बालकांना अटक करून थेट ४ घरफोडी प्रकरणांचा छडा लावला आहे. दि. २ जून २०२५ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना हडपसर पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांचा तपास पथक...

यामाहा मोटारसायकल चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगार जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची जलद कारवाई

0

पुणे, १९ एप्रिल २०२५ –कात्रज चौकात उसाचा रस विक्रीच्या दुकानासमोरून चोरीस गेलेल्या यामाहा कंपनीच्या दुचाकीचा पर्दाफाश करत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत आरोपीला अटक करून चोरलेली गाडी जप्त केली आहे. हा प्रकार १६ एप्रिल रोजी घडला होता, आणि केवळ काही दिवसांत पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीला गजाआड केले. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांची यामाहा...

पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमाला धडक देऊन पळ काढणारा वाहनचालक अवघ्या १० तासांत गजाआड!

0

पुणे, उंड्री: शहरातील वाढत्या रहदारीसह अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशातच पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी एका महत्त्वाच्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या १० तासांत अज्ञात वाहनचालकाला अटक करून पोलिसी खमकी कामगिरीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका व्यक्तीला धडक देऊन पसार झालेल्या आरोपीला शोधून काढण्याची मोहीम पोलिसांनी अत्यंत शिताफीने राबवली. अपघात कसा घडला? दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी...

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! आठ लाखांच्या कपड्यांची चोरी करणारा आरोपी जेरबंद, ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या अत्यंत कसोशीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईतून कल्याणीनगर येथील जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणारा आरोपी गणपत डांगी याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईने परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.  बातमीदाऱ्याच्या माहितीतून सापडला धागा दि. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकातील श्रेणी...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत!

0

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी यशस्वी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापासून बचाव झाला आहे. दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील पोलीस...

मस्ती अंगलट आली! जळगाव पोलिसांची टवाळखोर तरुणांना चोख अद्दल; थेट विवस्त्र करून काढली धिंड

0

जळगाव | दि. १५ जुलै २०२५ :- शहरात मस्ती आणि टवाळखोरी करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला पोलिसांनी थेट धडा शिकवत सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करून धिंड काढली, ही घटना शहरात चांगलीच गाजत आहे.शिस्तभंग, महिलांवर शेरेबाजी, आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या या तरुणांना जळगाव पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत कायद्याचा धाक दाखवला. पोलिसांची धडक कारवाई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी काही तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन,...

२४ तासांत खुनाचा उलगडा | आंबेगाव पोलिसांची गतीमान कारवाई -“जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून; आरोपी २४ तासांत इंदौरहून अटकेत!”

0

पुणे | आंबेगाव पोलीस स्टेशन – पुणे शहरात एका तरुणाचा थरारक खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत शोधून काढत आंबेगाव पोलिसांनी एक उदाहरणीय कामगिरी बजावली आहे. आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईने तो अखेर गुन्ह्यातील कबुली देत गजाआड गेला. दिनांक १४ जून २०२५ रोजी, जांभुळवाडी तलावाच्या बांधावर, एक तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत गोपनीय...

पास्तर बलजिंदर सिंगचा अमानवी कृत्यांचा पर्दाफाश – महिलांवरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज लीक!

0

नवी दिल्ली – पास्टर बलजिंदर सिंगवर महिलांसह त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा आरोप सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज लीक झाले आहे. या धक्कादायक फुटेजमध्ये तो महिलांवर हिंसक हल्ला करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर यापूर्वीच एका तरुणीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे, पण अजूनही त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. 🔸 महिला सुरक्षेचा प्रश्न – कायदा केवळ बघ्याची भूमिका...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सपत्नीक शासकीय महापूजा; आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तिभावाने नमतं स्तक

0

पंढरपूर (दि. ६ जुलै): आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत हरिनामाच्या गजरात भक्तिभावाने न्हालेलं वातावरण पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस यांच्यासह सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा करून राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि पोशाख अर्पण करण्यात आला. पूजेचा संपूर्ण...

पुणे पोलिसांची तिहेरी यशस्वी कारवाई : चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी व वाद्यपथकातील साहित्य चोरणारे आरोपी गजाआड!

0

पुणे – बाणेर परिसरात विविध स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अत्यंत कौशल्याने सोडवला आहे. चेन स्नॅचिंग, मोबाईल हिसकावणे आणि सांस्कृतिक साहित्य चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तिघांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटना १ : बालेवाडीतील चेन स्नॅचिंग प्रकरण दि. ११ जुलै २०२५ रोजी पर्ल सोसायटी, बालेवाडी येथे एका महिलेला...

Copyright ©