पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यासह सात जण जुगार अड्ड्यावर रंगेहाथ; पोलिसांची मोठी कारवाई, २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरातील धनकवडी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुना पत्रा कारखान्यात सुरू असलेल्या जुगार खेळामध्ये सात जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यात भाजप पदाधिकारी औदुंबर विठ्ठल कांबळे यांचाही समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोमवार संध्याकाळी सापळा रचून कारखान्यात...
पुण्यात निर्भीड हत्येची खळबळ! – बापट रोडवर तरुणाचा दिवसाढवळ्या खून; नागरिक भयभीत
पुणे, ४ नोव्हेंबर २०२५ – पुणे शहर पुन्हा एकदा हिंसेच्या हादऱ्याने हादरले आहे. शहराच्या गर्दीने भरलेल्या बाजीराव रोडवर एका तरुणाचा दिवसाढवळ्या निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. साक्षीदारांच्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी गर्दीतच धारदार शस्त्राने हल्ला करून तरुणाचा खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला....
हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा! आमदार शंकर जगताप यांचा ठाम पाठिंबा; नागरिकांच्या मागणीत राजकीय बळाची भर
हिंजवडी परिसराचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) समावेश व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन सह्यांची मोहीम आता अधिक जोमाने पुढे जात आहे. आयटी हब असलेल्या या भागातील नागरिक, आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, तसेच सामाजिक संघटना यांच्यातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, आता या मागणीला राजकीय पातळीवर मोठा पाठिंबा मिळाला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी या मोहिमेला ठाम...
तुळशीबाग मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे शहरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रांग वाद्य पथक, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम पार पडणार...
‘मिशन 100 डेज’ मोहिमेची जोरदार तयारी; हेमंत रासने यांनी स्वच्छतेच्या दूतांसोबत संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक केली, विकासाला नवी गती!
कसबा विधानसभा | प्रतिनिधी :- ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या सामूहिक ध्येयपूर्तीसाठी सुरू होणाऱ्या ‘मिशन 100 डेज’ उपक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. १६ व १७ मधील आरोग्य हद्दीचा प्रत्यक्ष दौरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करताना, त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या दौऱ्यात सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या...
चार तासांत आरोपीला अटक! वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या लुटारूला डेक्कन पोलिसांची चोख कारवाई!
पुणे:- पुणे शहरात दिवसाढवळ्या चोरी आणि जबरी लुटीच्या घटना घडत असताना डेक्कन पोलिसांनी अतिशय वेगवान आणि प्रभावी कारवाई करत अवघ्या चार तासांत एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या जलद गती तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रशंसा होत आहे. घटना कशी घडली? डेक्कन पोलीस ठाणे हद्दीतील नदीपात्र वीटभट्टी परिसरात एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रकार...
पुण्यात धक्कादायक घटना : डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार खंडणीप्रकरणी निलंबित! कायदेकर्तेच ठरले कायदाभंग करणारे?
पुणे | २१ जून २०२५ :- पुणे शहर पोलीस दलात एका अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकाराने खळबळ माजवली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदारांनीच एका तरुणाला खोट्या तक्रारीच्या नावाखाली अटक करण्याची धमकी देत थेट एटीएममध्ये नेऊन त्याच्याकडून तब्बल २०,००० रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. कायद्याचे रक्षक की भक्षक? पोलीस हे समाजाच्या सुरक्षेसाठी असतात, पण जेव्हा हेच रक्षक खंडणी वसूल...
पोलीस अधिकाऱ्यांच्या उज्वल कार्याचा गौरव!
पुणे | प्रतिनिधी:- पोलीस दलातील उत्कृष्ठ तपास कौशल्य, निष्कलंक सेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकांचे वितरण समारंभ यंदा दि. १३ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस संशोधन केंद्र, पाषाण, पुणे (सी.पी.आर.) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस...
पुणे: साधू वासवानी पुलाचे पाडकाम सुरू, नव्या पुलामुळे वाहतूक समस्या सुटणार.
कोरेगाव पार्क भागातील साधू वासवानी रेल्वे ओव्हर ब्रिज पाडण्याचे काम अखेर महापालिकेने सुरू केले आहे. या भागातील रहिवासी आणि प्रवासी काही आठवड्यांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत, कारण या रखडलेल्या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वाहतूक वळणांचा त्रास होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार, सध्याचा पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड वर्ष लागणार आहे. या कालावधीत वाहतूक मंगळदास रोड, बंड...
पुणे पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई! दोन्ही ठिकाणाहून ७.८८ लाख रुपयांचा दोडाचुरा व गांजा जप्त – पाच जणांना अटक
पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने मोठी कारवाई करत तब्बल ₹७,८८,१००/- किंमतीचा अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) व गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही विशेष कारवाई हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, ही धडक मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात...












