निगडीमध्ये खड्ड्यांमुळे रिक्षातून पडून ५० वर्षीय महिलेचा मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल.
पुणे: १६ ऑगस्ट रोजी हडपसर येथील ५० वर्षीय महिला निगडी येथील थेर्मॅक्स चौकाजवळ रिक्षातून पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीने निगडी पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १०६(२) आणि २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे...
पुणे गुन्हे शाखेची कारवाई; डेक्कन पोलिस ठाण्यातील वाहनचोरी प्रकरणातील विधीसंघर्षित बालक ताब्यात
पुणे : Pune Police यांच्या गुन्हे शाखेअंतर्गत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१ ने प्रभावी कारवाई करत डेक्कन पोलिस स्टेशनकडील वाहनचोरी प्रकरणातील पाहिजे असलेला एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेतला आहे. जनसंपर्क अधिकारी कार्यालय, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या माहितीनुसार, पथकातील पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, साईकुमार कारके आदी कर्मचारी गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. संबंधित इसमाकडे...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाश्वत विकासकामांचा जागतिक पातळीवर सन्मान….
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख मजबूत केली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 'स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०२५' दरम्यान आयोजित 'आंतरराष्ट्रीय शहरी आणि प्रादेशिक सहकार्य (IURC) ग्लोबल थीमॅटिक नेटवर्किंग कार्यशाळेत' सहभागी होण्यासाठी भारतातील सहा पायलट शहरांपैकी एक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि सहशहर अभियंता बापू...
भारतीय सैन्यासाठी वडोदऱ्याच्या विद्यार्थिनीची देणगी! २१ वर्षीय खुशी पठाणने तयार केला सौरऊर्जेवर चालणारा स्मार्ट गणवेश
वडोदरा : गुजरातमधील २१ वर्षीय फॅशन डिझाईन विद्यार्थिनी खुशी पठाण हिने भारतीय सैनिकांसाठी एक अनोखा व अभिनव शोध लावला आहे. तिने विकसित केलेला सौरऊर्जेवर चालणारा स्मार्ट गणवेश हा सैनिकांसाठी केवळ पोशाख नसून जीवन वाचवणारे साधन ठरू शकतो. गणवेशाची वैशिष्ट्येया खास गणवेशामध्ये सौरऊर्जा पॅनेल्स बसवलेले आहेत, ज्यामुळे सैनिकांना त्यांच्या मोबाईल फोन, कम्युनिकेशन डिव्हाइस, नाईट व्हिजन इक्विपमेंट, टॉर्च, GPS प्रणाली यांसारखी उपकरणे...
“पुणेकरांचा अधिकारनामा” सादर, ‘पुणे फर्स्ट’च्या भूमिकेतून काँग्रेसचा विकासाचा ठाम संकल्प
पुणे :- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक दस्तऐवज सादर करण्यात आला. “पुणेकरांचा अधिकारनामा” या नावाने ओळखला जाणारा हा जाहीरनामा पुणेकरांच्या मूलभूत अधिकारांवर, विकासावर आणि सन्मानावर केंद्रित असून “पुणे फर्स्ट” या भूमिकेतून प्रत्येक पुणेकराला सुरक्षित, आरोग्यदायी, समावेशक आणि आनंदी — जागतिक दर्जाचे शहर अनुभवता यावे, हा काँग्रेसचा ठाम संकल्प यातून...
गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव”चा दर्जा – पुण्यात पोलिसांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाला भव्य उत्सवाचा प्रारंभ
महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” म्हणून मान्यता दिली असून तो आता अधिकृतरीत्या “महागणेशोत्सव” या नावाने साजरा होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगतदार होणार असून सर्वत्र विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे पोलीस मुख्यालयात यानिमित्ताने 28 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साऊंड अँड लाईट डिस्प्ले, पोलीस बॅण्ड, पाईप बॅण्ड, डॉग...
पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’चे भव्य आयोजन – भारत-यूके शिक्षण संबंधांना नवी चालना
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (NISAU) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून यामागचा उद्देश भारत आणि युनायटेड किंगडममधील शैक्षणिक संबंध अधिक मजबूत करणे हा आहे. या...
हडपसरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक!
पुणे | हडपसर | १० मार्च २०२५:- हडपसर परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीचा वाढता धोका लक्षात घेता पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आणि धक्कादायक कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली. 🔹 औषधांचा गैरवापर वाढता धोका – युवा पिढीला गंडा 🔸 उच्च किंमतीमुळे अवैध नशिले पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अनेक तरुण सोप्या मार्गाने औषधांच्या सेवनाकडे वळत आहेत.🔸 या प्रकरणात अटक...
पुणे पोलिसांचा ऐतिहासिक निर्णय – ९६२ बेवारस वाहने लिलाव, पोलीस ठाण्यांचे परिसर झाले स्वच्छ!
पुणे – महाराष्ट्र सरकारच्या ‘१०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत’ पुणे पोलिसांनी ऐतिहासिक निर्णय घेत ९६२ बेवारस आणि बिनधनी वाहने लिलाव करून शहरातील पोलिस ठाण्यांचे परिसर स्वच्छ केले आहेत. या निर्णयामुळे पोलिस ठाण्यांभोवती वाढत चाललेला कचरा, जागेचा अपुरा वापर आणि नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्वच्छतेची मोहीम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सरकारी कार्यालये आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या...
मतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजा’वर पुणे पोलिसांची धडक कारवाई; १९ दुचाकी जप्त, ९६,७०० रुपयांचा दंड
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या मतमोजणीदरम्यान सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. हडपसर येथील साधना विद्यालय येथे सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेच्या वेळी काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये बेकायदेशीर बदल करून प्रचंड मोठा व कर्कश आवाज निर्माण केला. तसेच कर्कश हॉर्न वाजवून परिसरात गोंधळ आणि तणाव निर्माण करण्याचा...








