सामाजिक

Home सामाजिक Page 41

लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई! – अट्टल घरफोड्या गुन्हेगाराला मध्यप्रदेशातून अटक, 6.39 लाखांचा ऐवज जप्त

0

९ दिवसांत गुन्हा उघडकीस! – पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाची झलक पुणे शहरातील लोणी काळभोर पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि सातत्याने तपास करत मध्यप्रदेशातून घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करून, सुमारे ₹६.३९,९००/- किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हेगारी विश्वात वावर असलेल्या प्रतीक हिराचंद लिडकर (वय ३१) या आरोपीकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडीची घटना...

पुणे पोलिसांची गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई! ६ सराईत गुन्हेगार तडीपार; परिमंडळ ५ ने दाखवली कडक भूमिका

0

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली ६ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, गुन्हेगारी...

“ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला! लाहोरमध्ये सलग स्फोट – युद्धजन्य स्थितीची भीती वाढली!”

0

पाकिस्तान पुन्हा हादरला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, लाहोर शहरात सलग स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. काल रात्री उशिरा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरातील गोपाल नगर, नसीराबाद आणि वॉल्टन रोड परिसरात एकामागून एक तीन स्फोट झाले, अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांनी परिसरात...

मोठा गौप्यस्फोट! निलंबित PSI रंजीत कसले पुण्यातून अटक; EVM घोटाळा व बनावट एन्काउंटर प्रकरणात सरकारवर गंभीर आरोप

0

पुणे / बीड: निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजीत कसले याला बीड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट येथील एका हॉटेलमधून अटक केली. तो दिल्लीहून गुरुवारी पुण्यात आला होता आणि पुणे किंवा बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे त्याने सोशल मीडियावर जाहीर केले होते. ₹५० कोटींचा घोटाळा? सरकारवर थेट आरोप अटकेच्या आधी कसलेने सोशल मीडियावर एकापेक्षा एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट करून सरकारवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर...

पुण्यात सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई — चार आरोपी, तीन पिस्तुलं, तीन जिवंत काडतुसे जप्त; दोन बालकांसह टोळी उद्ध्वस्त

0

पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरूच असून, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने नुकतीच एक मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन विधीसंघर्षित बालकांसह दोन प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन पिस्तुलं आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ₹१.२१ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खात्रीशीर माहिती, आणि क्षणाचाही विलंब न करता कारवाई दि. ४...

“कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी शेखर सिंह यांना पिंपरी-चिंचवडकरांचा नागरी सत्कार – शहराच्या विकासासाठी दिलेलं योगदान अविस्मरणीय!”

0

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. श्री. शेखरजी सिंह यांचा ‘‘नागरी सत्कार सोहळा’’ चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. शहराच्या सर्वच घटकांचा सहभाग असलेल्या या सोहळ्यात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, अधिकारी आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन शहराच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शेखर सिंह यांचा सन्मान केला. या...

पुणे पोलिसांची कारवाई: १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त; दोघांना अटक.

0

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (युनिट २) आणि खंडणीविरोधी पथकाने (युनिट २) संयुक्त कारवाईत मोठा गुन्हा रोखत दोन कुख्यात आरोपींना अटक केली. या कारवाईत ₹१४.६ लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी), एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्याची माहिती व आरोपींची ओळख: अटक करण्यात आलेले आरोपी आहेत: बॉबी भगवान सुरवसे (२८) - गजराज...

इको पॉइंटच्या खोल दरीत अडकलेला कुत्रा तब्बल दोन दिवसांनंतर सुखरूप बाहेर – ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन पथकाची’ शौर्यगाथा!

0

माथेरान | निसर्गरम्य माथेरानमधील प्रसिद्ध इको पॉइंटजवळील लँडस्केप पॉइंटच्या 150 ते 200 फूट खोल दरीत अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याला तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर सोमवारी संध्याकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही अत्यंत धाडसी व संवेदनशील मोहिम ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संघटनेच्या’ बचाव पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सह्याद्री मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी सहनशीलता, धाडस आणि संयम यांचे...

विमानतळ पोलिसांची चतुर कारवाई: सराईत गुन्हेगाराला अटक; दोन चोरीच्या दुचाकी जप्त

0

पुणे :- विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सक्रिय असलेल्या पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडत सराईत दुचाकी चोरट्याला रंगेहात अटक केली आहे. या अटकेमुळे दोन विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या दुचाकींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक ५ मे २०२५ रोजी विमानतळ पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोहगाव येथून दुचाकी चोरून सध्या...

Copyright ©