पुण्यातील कॅनरा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला; २४ तासांत विधीसंघर्षित बालक ताब्यात, गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कारवाई!
पुणे | मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखा युनिट ६ ने अवघ्या २४ तासांत एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेऊन मोठा गुन्हा उधडकीस आणला. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपास कौशल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. घटनेचे सविस्तर विवरण दि. १३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री मांजरी खुर्द येथील कॅनरा बँक शाखेचे बाहेरचे शटर...
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी; उद्या सायंकाळी शपथविधी होणार
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत असून, स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची अधिकृत निवड शनिवारी केली जाणार असून, त्यानंतर उद्या सायंकाळी राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची विश्वासार्ह माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा...
मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची घेतली माहिती
पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि महसूलवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाला भेट दिली. यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी या शिष्टमंडळाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी मालमत्ता कर व्यवस्थापनातील विविध प्रक्रिया, महसूलवाढीसाठी...
बारामतीत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारांची तयारी अंतिम टप्प्यात; विद्याप्रतिष्ठान मैदानावर शोकाकुल वातावरण
बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर होणाऱ्या अंत्यसंस्कारांच्या तयारीला बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर वेग आला असून, संपूर्ण परिसरात शोकमय आणि गंभीर वातावरण आहे. राज्यभरातून हजारो नागरिक, कार्यकर्ते, राजकीय नेते, सामाजिक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी बारामतीकडे रवाना होत आहेत. विद्याप्रतिष्ठान मैदानात अंत्यदर्शनासाठी विशेष मंडप, सुरक्षा बॅरिकेड्स, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही गैरसोय होऊ...
“मद्यविक्री शुल्कात वाढ, VAT आणि दरवर्षी परवाना नूतनीकरणाच्या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिकांचा संताप; परवाने परत करण्याचा इशारा!”
नवी मुंबई हॉटेल मालक संघटना (NMHOA) यांनी राज्य सरकारच्या मद्यविक्री शुल्क वाढ, मूल्यवर्धित कर (VAT) आणि दरवर्षी वाढणाऱ्या परवाना नूतनीकरण शुल्काविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेने एका जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारच्या या निर्णयांना अन्यायकारक, एकतर्फी आणि मद्यउद्योगासाठी घातक ठरवले आहे. १) मद्यविक्री शुल्क वाढ – भार वाढतच आहे! राज्य पातळीवरील विविध प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारने...
मोशी परिसरात भीषण हिट अँड रन; मद्यधुंद कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी-चिंचवड : Pimpri-Chinchwad शहरातील मोशी परिसरात सोमवारी उशिरा रात्री भीषण ‘हिट अँड रन’ची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने बेफाम वेगात वाहन चालवत सात ते आठ चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना रात्री सुमारे साडेअकराच्या...
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहराच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात तसेच महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून शहरातील विकास कामांचा वेग वाढविण्याचे आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक...
वाघोलीत पुन्हा मारहाण प्रकरणाने खळबळ; बकोरी रोडवरील कॅफेत झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वाघोली : वाघोली परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बकोरी रोड, जेएसपीएम कॉलेजजवळील ‘बैठक कॅफे’ येथे झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुणांमध्ये झालेला वाद अचानक हाणामारीत बदलल्याचे दिसत असून काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विक्रमी ‘माईलस्टोन’! अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटींची मालमत्ता कर वसुली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत इतिहास घडवत मालमत्ता कर वसुलीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले असून, महापालिकेच्या इतिहासातील ही पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. नागरिकांनी वेळेत कर भरत विविध सवलतींचा लाभ...
काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे मतदान; लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन
बारामती (काटेवाडी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. साध्या व संयत पद्धतीने मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...









