सामाजिक

Home सामाजिक Page 211

राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता

0

पिंपरी :-  'महापौर चषक ही केवळ स्पर्धा नसून राज्यातील नवोदित खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे. पिंपरी चिंचवड शहर क्रीडा संस्कृतीला चालना देणारे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे, आणि अशा स्पर्धांमधून भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आहे, ' असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या स्पर्धेत  पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ...

महाराष्ट्रात महिंद्राची ₹15,000 कोटींची मेगा गुंतवणूक; 15 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती, ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजुरी

0

मुंबई/नागपूर : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना देणारा आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यात तब्बल ₹15,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 15,000 हून अधिक थेट...

कोंढवा येथे मोठी कारवाई: १३.६ लाखांच्या मेफेड्रॉनसह एक जण अटक, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी धडक

0

पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (Anti-Narcotics Cell - 2) ने मोठी यशस्वी कारवाई करत १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, कोंढवा परिसरातील अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर...

हडपसर काळेपडळ येथे प्रचारादरम्यान शिवसेना नेत्यांच्या वाहनावर दगडफेक; उमेदवार सारिका पवार गंभीर जखमी

0

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकीय वातावरण तापत असतानाच हडपसर परिसरातील काळेपडळ येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या वाहनावर प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाना...

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही...

‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेल्या 11 जणांचा मृत्यू, 20 जखमी

0

पालघर जिल्ह्यात सोमवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या पाहुण्यांनी भरलेल्या टेम्पोला भरधाव कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही भीषण दुर्घटना पालघर जिल्ह्यातील दहाणू तालुक्यातील धानीवारी...

पुणे शहरात ट्रिपल सीट वाहनचालकांवर मोठी कारवाई; दोन दिवसांत २६४९ प्रकरणे नोंद

0

पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक १२/०२/२०२६ व १३/०२/२०२६ रोजी पुणे शहर वाहतूक विभाग आणि सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम हाती घेतली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक शिस्तीचा अभाव लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. शहरभर एकाच वेळी धडक कारवाई पुणे शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीचे चौक आणि वाहतूक दाटीच्या भागांमध्ये एकाच...

चंदननगरमध्ये ड्रग्ज माफियांवर पुणे पोलिसांचा मोठा घाव; २५ लाखांचा मॅफेड्रॉन जप्त, एक आरोपी अटकेत

0

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक ०२ ने चंदननगर परिसरात मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अंमली...

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई; ४.२७ कोटींचा एमडी जप्त, अंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेट उध्वस्त

0

पुणे : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पुणे पोलिसांनी मोठे यश संपादन करत राजस्थानपर्यंत जाळे पसरलेल्या मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. ०३/०२/२०२६ रोजी...

Copyright ©