महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 236

वाकड पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे आयुक्तांना निवेदन

0

पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत वर्दळीच्या बेंगळुरू–मुंबई महामार्गावरील वाकड पुलाचे रखडलेले काम आता नागरिकांच्या संतापाचा विषय बनले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळे, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्य श्रुती राम वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत पुलाचे काम तातडीने...

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होता पत्त्यांचा गैरकायदेशीर खेळ; ६ लाख रुपयांची रोकड जप्त

0

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्त्यांचा गैरकायदेशीर खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत या खेळात गुंतलेल्या व्यक्तींना अटक केली. या कारवाईत तब्बल ६ लाख रुपयांची रोकड, पत्त्यांचा संच, आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह काही प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस तपासानुसार, या ठिकाणी अनेक...

वादग्रस्त प्रकरण! पोलीस अधिकाऱ्याची हप्ता वसुली? – ₹८०० च्या चष्म्यासाठी पैसे न देता दुकानातून निघाले अधिकारी!

0

एका पोलीस अधिकाऱ्याने एका छोट्याशा दुकानातून चष्म्याच्या काचा बदलून घेतल्या, ज्याची किंमत अवघी ₹८०० होती. मात्र, दुकानदाराने कितीही विनंती केली तरीही अधिकाऱ्याने पैसे दिले नाहीत, असा आरोप थेट दुकान मालकाने केला आहे. हक्काने सेवा घेतली, पण पैसे मात्र नाहीत! दुकानदाराने सांगितले की, संबंधित पोलीस अधिकारी वर्दीमध्ये आले होते, त्यांनी चष्मा निवडला, बदलून घेण्यास सांगितले, आणि नंतर पैसे न देता “बघू नंतर…”...

पुण्यात खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश! मासेविक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देत ४८ लाखांची खंडणी वसूल करणाऱ्या सराईत गुंडांवर कारवाई

0

फरासखाना, पुणे | १० जून २०२५ :- पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील एका मासे विक्रेत्याला तब्बल ९ वर्षांपासून जीवे मारण्याची धमकी देत दर महिन्याला ५० हजार रुपये खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. फिर्यादीकडून सुमारे ४८ लाख रुपये ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, फरासखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात शिवम उदयकांत...

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुल विकास कामांचा अंतर्भाव असलेल्या 532.51 कोटी किमतीच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.   स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी...

पुणे : कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण – आरोपी पीडितेला परिचित; सेल्फी तिच्या संमतीने घेतले, फोटो संपादित; रसायन फवारल्याचे पुरावे नाहीत!

0

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती – प्राथमिक तपासात मोठा खुलासा पुणे – कोंढवा परिसरात घडलेल्या २२ वर्षीय आयटी महिला व्यावसायिकावर कथित बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक वळण समोर आले आहे. पीडित महिला आणि आरोपी पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते, आणि फोटो तिच्या संमतीने काढण्यात आला असून, तो नंतर संपादित करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गंभीर...

पुणे: स्मार्ट सिटीमध्ये पादचाऱ्यांसाठी सुरक्षा धोरण फक्त कागदावरच! १२० पादचाऱ्यांचा मृत्यू.

0

पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पादचाऱ्यांची सुरक्षा मात्र अद्याप कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. फुटपाथवर अतिक्रमणाचा विळखा: पुणे शहरात सुमारे १,४०० किलोमीटर लांब रस्ते आहेत, त्यापैकी ८२६ किलोमीटर रस्त्यांवर फुटपाथच नाहीत. उर्वरित ५७४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर जरी फुटपाथ असले तरी ते...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; सर्व धोकादायक रचनांची सात दिवसांत तपासणी करण्याचे आदेश!

0

पुणे | १८ जून २०२५ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व पूल, रस्ते, वाडे, धोकादायक इमारती, रेल्वे पूल, फलक व इतर सार्वजनिक संरचना यांची structural audit करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला असून...

पुण्यात चंदन चोरीचे सत्र कायम: लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळील तीन झाडे चोरीला; पोलिसांचा तपास सुरू

0

पुणे शहरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळील तीन चंदनाची झाडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पांडीयराज मुरुगन (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. आरिफा मुजावर यांनी याबाबतची माहिती दिली. घटनाक्रम लष्करी अधिकाऱ्यांचे बंगले लष्कर भागातील पूना क्लबजवळ डॉ. राजेंद्रसिंग मार्गावर आहेत. नाताळानिमित्त अधिकारी बाहेरगावी गेले असताना, दोन...

मराठा लोकांचे संस्कार जपणारी परंपरा – जेवणानंतर लगेचच स्वच्छता, लातूरकरांचे संस्कार

0

लातूर जिल्ह्यातील नागरिक आपल्या दैनंदिन जीवनशैलीत शिस्त आणि स्वच्छतेला मोठे महत्त्व देतात. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर लगेचच घराची व आजूबाजूची स्वच्छता करण्याची प्रथा इथल्या प्रत्येक कुटुंबात आढळते. "जेवण करून लगेच झाडू घेणे हे आमचे संस्कार आहेत," असे अनेक लातूरकर अभिमानाने सांगतात. मराठा समाजाच्या या सुंदर परंपरेतून शिस्तबद्ध जीवनशैलीची झलक दिसते. जेवणानंतर घर आवरणे, अंगण स्वच्छ करणे आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागी...

Copyright ©