Breaking News

Home Breaking News Page 219

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक्सप्रेसवे क्रांती

0

पुणे/दिल्ली : देशाच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात काही प्रकल्प असे असतात, जे केवळ एक महामार्ग राहत नाहीत, तर नेतृत्व आणि दृष्टीकोनाची ओळख बनतात. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक्सप्रेसवे क्रांती. विशेषतः दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग, तसेच पूर्व-पश्चिम कॉरिडॉर प्रकल्पांमुळे गडकरींना देशभरात ‘हायवे मॅन ऑफ इंडिया’ अशी वेगळी ओळख मिळाली. विकासाची नवी गती : एक्सप्रेसवेजनी...

एनडीए प्रवेश परीक्षेत पुण्याची ऋतुजा वऱ्हाडे देशात पहिली; ध्येय, जिद्द आणि कर्तृत्वाचा अनोखा संगम

0

पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे हिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेत देशभरातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक आणि एकूण रँकिंगमध्ये तिसरा क्रमांक मिळवून अभूतपूर्व यश मिळवलं आहे. तिच्या या गगनभरारीमुळे पुण्याच्या नावलौकिकात भर पडली असून, ती आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. एनडीए प्रवेश परीक्षेसाठी यंदा सुमारे दीड लाख मुलींनी अर्ज केला होता. अशा या प्रचंड स्पर्धेत ऋतुजाने मिळवलेलं हे यश तिच्या मेहनतीची,...

“पुणे स्थित पीएनजी ज्वेलर्सच्या अमेरिकेतील आउटलेटवर जवळपास २० चोरांनी स्लेजहॅमरने चोरी केली; व्हिडिओ व्हायरल.”

0

भारतीय दागिन्यांच्या व्यवसायांना लक्ष्य करणाऱ्या सशस्त्र चोरीच्या घटनांची मालिका, न्यूर्क ते सनीवेल पर्यंत पसरली असून, त्यातून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि व्यवसाय मालक आणि स्थानिक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या उच्च-प्रोफाइल चोरीच्या घटनांपैकी किमान तीन सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात घडल्या आहेत. चोरीच्या घटनांवर अधिकाऱ्यांच्या बैठका सनीवेल शहराचे महापौर लॅरी क्लेन यांनी शुक्रवारी उपमहापौर मुरली श्रीनिवासन, पोलिस प्रमुख फान न्गो,...

“बिल्डर-शाळा माफियांनी गिळला नैसर्गिक नाला, राहटणी-काळेवाडी बुडण्याच्या उंबरठ्यावर” – लोकसेवक युवराज दाखले यांचा आरोप, अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी

0

पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी)दि. २५ मे २०२६: प्रभाग क्र. २७ राहटणी-काळेवाडी, साई सागर कॉलनी, वृंदावन कॉलनी तापकीर नगर परिसरातील नैसर्गिक नाल्यावर बांधकाम व्यावसायिक व एका नावाजलेल्या इंग्रजी शाळा व्यवस्थापनाने संगनमत करून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा खळबळजनक आरोप लोकसेवक युवराज दाखले यांनी केला आहे. पावसाळा 20 दिवसांवर असताना हे अतिक्रमण न हटवल्यास संपूर्ण परिसर महापुरात बुडून जीवितहानी होईल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे. लोकसेवक...

पुण्यात गोळीबार करून फरार झालेल्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; ५ आरोपी ताब्यात, विदेशी पिस्तूल व मोटारसायकल जप्त

0

पुणे : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे यश मिळवले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथक-१ यांच्या संयुक्त कारवाईत या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट...

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0

पिंपरी :- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास...

भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!

0

पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...

‘स्मृतिगंध’ स्मारकात रुजलेली प्रेरणा; सुरंगीचे झाड आजही सांगते अजितदादांच्या समाजसेवेची कहाणी

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. गोविंदराव निकम साहेब यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाच्या उद्घाटनावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. Ajit Pawar यांच्या हस्ते लावण्यात आलेले सुरंगीचे झाड आज दिमाखात उभे आहे. काळाच्या ओघात वाढत गेलेले हे झाड आता त्या ऐतिहासिक क्षणाचे जिवंत स्मारक बनले आहे. उद्घाटनावेळी वृक्षारोपण करताना अजितदादांनी व्यक्त केलेली शिक्षणाविषयीची आस्था आणि समाजसेवेची...

साताराचे वीर सुपुत्र अमर पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; “भारत माता की जय, अमर पवार अमर रहे” च्या घोषणांमध्ये वीर जवानाला अखेरचा निरोप.

0

नक्षलवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या अमर पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी सारा सातारासह खंडाळा तालुका दुःखात सातारा : खंडाळा तालुक्यातील बावडा गावचे रहिवासी, शहीद जवान अमर पवार यांना सोमवारी भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. "अमर पवार अमर रहे" या घोषणांनी वातावरण भारावले होते. शहीद पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळगावी आणल्यानंतर, त्यांच्या दुःखी कुटुंबीयांची हृदयद्रावक अवस्था पाहून उपस्थित...

शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : "कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे हेच या योजनांचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेस चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर सुसंगत आणि परिणामकारक योजना राबविण्यात याव्यात," असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.              उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज "दिशा कृषी उन्नतीची @2029" आणि "कृषी समृद्धी योजना 2025-26" या...

Copyright ©