Breaking News
ताथवडे येथे उभारले जाणार पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय; २० हेक्टर जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा, शहराच्या सुरक्षेला मिळणार नवे बळ
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे स्वतंत्र मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर प्रशासकीय कार्यालयांसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील तब्बल २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली...
पुणे: रांजणगाव MIDC परिसरातून २१ बांगलादेशी नागरिक ताब्यात; पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई.
पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने, रांजणगाव पोलिसांच्या सहकार्याने, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवैधरित्या राहत असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये १५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे, तसेच त्यांच्यासाठी मदत करणाऱ्या दोन व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण कर्हाडगावातील भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासादरम्यान या लोकांकडून बनावट ओळखपत्रे, निवडणूक कार्डांसह...
प्रामाणिकपणाचा झळाळता दीपस्तंभ! – अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजारांची सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे सुपूर्त; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
शिरूर, पुणे | आजच्या भौतिकवादी युगात स्वार्थी वृत्तीने ग्रासलेल्या समाजात, प्रामाणिकतेचा उजळ व अनुकरणीय आदर्श निर्माण करणारी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील बो-हाडे मळा येथील 'हॉटेल वैभव'चे मालक अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि महत्वाची कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे पोलीसांच्या उपस्थितीत सुपूर्त केली. या प्रामाणिकपणाच्या उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाकिट सापडल्यापासून सुपूर्त होईपर्यंतची घटना घटना काही दिवसांपूर्वीची. हॉटेल...
मा.श्री. जे.पी. नड्डा जी ! यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची आरतीही केली. यावेळी मा. नड्डा जी यांचं श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत स्वागतपर सन्मान केला.
नेते, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांनी आज आपल्या श्री साई मित्र मंडळाला भेट दिली. यावेळी मा. नड्डा जी यांनी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचं पूजन करत गणरायाची आरतीही केली. यावेळी मा. नड्डा जी यांचं श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देत स्वागतपर सन्मान केला. प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो गणेशभक्त उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट; विविध विषयांवर मनमोकळा संवाद
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत करण्यात आले. राजकीय, सामाजिक तसेच राज्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी मनमोकळ्या गप्पा झाल्या. या भेटीत खा. नारायण राणे यांनी आस्थेने प्रकृतीची विचारपूस करत उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे वातावरण अधिकच...
श्रेया बुगडे यांनी केले लालबागचा राजाचे दर्शन, भाविकांसोबत गणपतीच्या आरतीमध्ये सहभाग
मुंबईतील लालबागचा राजा येथे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या या पावसाळी महिन्यात त्यांच्या उपस्थितीने भाविकांमध्ये एक वेगळीच उत्साहाची लाट निर्माण झाली. श्रेया बुगडे या मराठी चित्रपटसृष्टीतील एक ओळखीच्या अभिनेत्री असून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्यामुळे अनेक प्रशंसक मिळवले आहेत. काल सकाळीच श्रेया यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी योजना आखली. त्यांनी साधी परंतु आकर्षक पारंपरिक पोशाख घातला होता....
कुंडमाळा दुर्घटना : आमदार सुनील शेलके यांनी अथर्व हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन दिला आधार; उपचारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
तळेगाव दाभाडे | १६ जून २०२५ :- कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण मावळ परिसर शोकाकुल झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर तळेगाव दाभाडे येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज मावळचे आमदार श्री. सुनील शेलके यांनी वैयक्तिकरित्या हॉस्पिटलला भेट देत प्रत्येक जखमी रुग्णाची विचारपूस केली, त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून...
बिबवेवाडी पोलीसांची मोठी कामगिरी! रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद — १.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे शहरात वाढत्या घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलीसांनी राबवलेल्या प्रभावी कारवाईतून रेकॉर्डवरील एका सराईत चोराला अटक करण्यात आली असून तब्बल ₹१,८०,००० किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या यशस्वी ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. घटनेचा तपशील १० ऑक्टोबर २०२५ रोजी एका महिलेकडून त्यांची दुचाकी चोरीस गेल्याबाबत तक्रार...
राष्ट्रवादी काँग्रेसला नवे नेतृत्व; सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड
मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची निवड होणे हा पक्षासाठी भावनिक, ऐतिहासिक आणि दिशादर्शक क्षण ठरला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांनी ज्या ठाम विचारधारेतून, संघटनकौशल्यातून आणि जनहिताच्या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली, त्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षातील ज्येष्ठ...
बॉलिवूडमध्ये गाजलेला वाद! अभिनेत्री रुचि गुज्जरने निर्मात्यावर केला फसवणुकीचा आरोप – २४ लाखांचा गोंधळ उघड
मुंबई :- मुंबईतील ग्लॅमरस जगतात पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्री रुचि गुज्जर हिने हिंदी चित्रपट ‘So Long Valley’ च्या निर्माता करण सिंह चौहान याच्याविरोधात धोखाधडी, गुन्हेगारी विश्वासघात आणि धमकी देण्याचे गंभीर आरोप करत FIR नोंदवली आहे. प्रकरण तब्बल २४ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. सह-निर्मात्याच्या नावाखाली २४ लाखांचा...









