Breaking News
जनतेचा आशीर्वादच खरी ताकद; घराघरात पोहोचताना मिळतोय भरभरून प्रतिसाद – सुनील अण्णा शेळके
पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रत्येक सोसायटी, प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधताना मिळणारा विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन सुनील अण्णा शेळके यांनी केले. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि उत्साह पाहता विकासाच्या मुद्द्यांवर मतदार ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. सुनील अण्णा शेळके म्हणाले की, आजचे मतदार सुज्ञ...
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही...
चतुःश्रृंगी पोलिसांची मोठी कारवाई! परिसरात दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार ’औदुंबर उर्फ मोन्या नाकते’ एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर शेवटी पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. औदुंबर उर्फ मोन्या रविंद्र नाकते (वय 29 वर्षे, रा. जनवाडी, गोखलेनगर) हा परिसरातील सराईत आणि मनमानी वर्तन करणारा गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या अभिलेखावर कुख्यात आहे. मोन्या नाकते आणि त्याच्या साथीदारांनी चतुःश्रृंगी, हिंजवडी आणि वाकड पोलीस...
केएसबी लिमिटेडची तिसऱ्या तिमाहीत दमदार झेप; नव्या प्रकल्पांच्या जोरावर मजबूत आर्थिक कामगिरी
पुणे : जागतिक पातळीवर पंप आणि वाल्व निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या केएसबी लिमिटेडने जुलै ते सप्टेंबर 2025 या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अत्यंत प्रभावी आर्थिक वाढ नोंदवली आहे. विविध देशांत मिळालेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे, तांत्रिक नवकल्पनांमुळे आणि मजबूत ग्राहकविश्वासामुळे या तिमाहीत कंपनीची कामगिरी आणखी भक्कम झाल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे विक्री उत्पन्न सातत्याने वाढत असून, जागतिक आव्हानात्मक बाजारस्थितीतही केएसबीने उल्लेखनीय कामगिरी...
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा कडक प्रहार – मद्यधुंद व ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम; ९५२ जणांवर कारवाई
पुणे | शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणारे तसेच ट्रिपल सीट दुचाकी वाहनचालक यांच्याविरोधात कडक व धडक कारवाई केली आहे.दि. २ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नियमभंग उघडकीस आला आहे. वाहतूक शिस्त अबाधित राखणे, रस्ते...
नवभारत टाइम्सच्या ७५व्या स्थापना दिनानिमित्त विलेपार्ले येथे भव्य सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
मुंबई : विलेपार्ले येथे आयोजित Navbharat Times च्या ७५व्या स्थापना दिन सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. गेल्या सात दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या वृत्तपत्राने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर प्रभावीपणे प्रकाश टाकत वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis, खासदार Milind Deora तसेच Maharashtra Times चे संपादक पराग...
पिंपरी चिंचवड महापालिकेत ३२ कर्मचाऱ्यांचा सत्कार; सातत्यपूर्ण सेवेला सलाम!
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत दीर्घकाळ परिश्रम घेतलेल्या ३२ कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महापालिकेच्या विविध विभागांत काम करून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सचोटी, सातत्य आणि जबाबदारीची जपणूक करत महापालिकेच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिल्याचे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले. तसेच त्यांनी सर्व सेवानिवृत्तांना "आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा" दिल्या. ...
“आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ निघाली रॅली; युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी
पुणे : समाज कल्याण विभाग स्थापना दिन व व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी" या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा यादरम्यान हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. या रॅलीचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव...
हडपसर काळेपडळ येथे प्रचारादरम्यान शिवसेना नेत्यांच्या वाहनावर दगडफेक; उमेदवार सारिका पवार गंभीर जखमी
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकीय वातावरण तापत असतानाच हडपसर परिसरातील काळेपडळ येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या वाहनावर प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाना...
भांबुर्डा राखीव जंगलात बेकायदेशीर मलबा टाकणाऱ्या दोन डंपरवर कारवाई; वन विभागाचा मोठा धडक मोहीमेला वेग
पुणे: पुण्यातील भांबुर्डा येथील राखीव जंगल क्षेत्रात बांधकामाचा मलबा आणि अजैविक कचरा बेकायदेशीररीत्या टाकणाऱ्या दोन खासगी डंपरवर वन विभागाने मोठी कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या जंगल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कचरा टाकण्याच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून ही कारवाई त्याचाच एक भाग आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या...









