Breaking News
तडीपार आदेशाचा भंग करणारा आरोपी जेरबंद! गुन्हे शाखा युनिट ३ ची कौतुकास्पद कारवाई
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत सज्ज आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कोथरूड परिसरात तडीपार आदेशाचा भंग करून लपून बसलेल्या एका आरोपीस अचूक माहितीच्या आधारे पकडण्याची धडाकेबाज कारवाई. दि. १८ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस पथक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या निर्देशानुसार पेट्रोलिंग करत होते. सपोफौ पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार अमोल काटकर...
मालदा रेल्वे स्थानकातून पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनला हिरवा झेंडा; हावडा–गुवाहाटी दरम्यान जलद आणि आरामदायी प्रवासाला नवी सुरुवात
मालदा : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडत, मालदा रेल्वे स्थानकावरून पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही अत्याधुनिक ट्रेन आता हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणार असून, पूर्व भारत आणि ईशान्य भारत यांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी पद्धतीने जोडणार आहे. या ऐतिहासिक क्षणी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, ही ट्रेन केवळ वाहतुकीचे साधन नसून, ती देशाच्या...
मतदान केंद्रांवर थेट पाहणी; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सुरक्षा व्यवस्थेवर कटाक्ष
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत असून, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो. यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाहणीदरम्यान श्री. अमितेश कुमार यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी...
तमिळ संस्कृतीच्या वैभवाचा भव्य अविष्कार! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘शैव सिद्धांत आणि चोळ मंदिर कला’ प्रदर्शनाला दिली भेट
नवी दिल्ली | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 'शैव सिद्धांत आणि चोळ मंदिर कला' या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन तमिळ इतिहास, संस्कृती आणि अध्यात्मिक वारशाचे गगनभरारी घेतलेले दर्शन घेतले. या प्रदर्शनाने प्राचीन भारताच्या दक्षिणेकडील संस्कृतीचा समृद्ध ठेवा समोर आणला आहे. प्रदर्शनात काय आहे विशेष? या प्रदर्शनात शैव परंपरेची तत्वज्ञानात्मक मांडणी, नटराज मूर्तीची विविध रूपं, चोळ साम्राज्याच्या कालखंडातील भव्य मंदिर शिल्पकला, कांस्य...
सौर ऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची विजेच्या बिलात तब्बल ५ कोटी ९१ लाखांची बचत
पिंपरी, ३१ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतितास ३ मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. यामुळे महापालिकेच्या वीजबिलात तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची बचत झाली आहे. महापालिकेने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत स्वमालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा...
“विकसित पिंपरी-चिंचवडचा संकल्प: भाजपचा जाहीरनामा शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रसिद्ध”
पिंपरी–चिंचवड – “विकसित भारत” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून केंद्र सरकारने दमदार वाटचाल केली आहे. त्याच धर्तीवर “विकसित महाराष्ट्र” घडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर “विकसित पिंपरी-चिंचवड” या ध्येयाने प्रेरित होऊन भाजपने शहरासाठी पुढील पाच वर्षांचा भक्कम आणि दूरदर्शी संकल्पनामा सादर केला आहे. हा संकल्पनामा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह...
मतमोजणीवर रुपाली ठोंबरे ताई यांचा बहिष्कार; ‘मतचोर’चा आरोप करत भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी, केंद्रावर तणावाचे वातावरण
मतमोजणीच्या दिवशीच राजकीय वातावरण तापले असून उमेदवार रुपाली ठोंबरे ताई यांनी थेट मतमोजणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. “मतचोर”चा आरोप करत त्यांनी मतमोजणी केंद्रावर भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. मतमोजणीदरम्यान गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे ताई यांनी आपले प्रतिनिधी...
फरासखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई — ‘एक किलो सोने’ चोरी करणारा कामगार सात राज्यांत पळूनही अखेर जेरबंद; १.२७ कोटींचा मुद्देमाल सुरक्षित
पुणे — शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘एक किलो सोने चोरी’ प्रकरणाचा फरासखाना पोलिसांनी थरारक उलगडा केला असून, सात राज्यांत पळत राहून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर पकडला आहे. तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे एक किलो शुद्ध सोने सुरक्षित हस्तगत करण्यात पोलिसांना शंभर टक्के यश मिळाले आहे. 🔹 चोरीचा सिनेमासारखा प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठेतील Precious Refinery या दुकानात...
भारत–युरोप आर्थिक भागीदारीला नवी दिशा; India-EU Business Forum ठरला मैलाचा दगड
नवी दिल्ली | प्रतिनिधीभारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने India-EU Business Forum हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे ठरले. या मंचावर दोन्ही बाजूंमधील व्यापारी, उद्योगपती, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांनी भारत-युरोपमधील व्यापक आर्थिक संबंधांवर सखोल चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप्स यांसारख्या अनेक क्षेत्रांतील संधींवर सकारात्मक संवाद झाला. या मंचावर आज भारत-युरोप मुक्त व्यापार...
भोसरीत धक्कादायक उघड! अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला ATS कडून अटक – व्हिसाची मुदत संपूनही राहत होती पुण्यात
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) भोसरी परिसरात एक मोठी कारवाई करत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश केला आहे.ही महिला व्हिसाची मुदत संपूनही गेल्या काही वर्षांपासून भोसरी परिसरात राहत होती, आणि स्थानिक नागरिकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेली होती. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला कोण? फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे.ती गेल्या...









