Breaking News
बाणेरमध्ये अंमली पदार्थविरोधी कारवाई – दोन आरोपींकडून ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त
पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी ब्लुमिंगडेल्स सोसायटी, ज्युपिटर हॉस्पिटल समोर, बाणेर, पुणे येथे कारवाई करण्यात आली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –1️⃣...
मुंबईत वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण — नागरिकांना मिळणार अखंड प्रवासाचा अनुभव!
मुंबई : महानगरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून सर्व वाहतूक पायाभूत सुविधा — मेट्रो, मोनोरेल, बस, उपनगरी रेल्वे आणि स्थानिक रस्ते — यांचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शहरात विविध वाहतूक व्यवस्था स्वतंत्रपणे कार्यरत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, या सर्व व्यवस्थांना एकत्र...
आई-वडिलांशी किरकोळ वाद… आणि थेट पुण्याला! पुणे पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे १६ वर्षीय मुलगी सुखरूप घरी परतली
पुणे :- हिंगोली जिल्ह्यातील एका लहानशा गावातून अचानक बेपत्ता झालेली १६ वर्षीय मुलगी पुण्यात सापडली. आई-वडिलांशी झालेल्या किरकोळ वादामुळे मानसिक तणावात आलेल्या या मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले आणि पुणे गाठले. मात्र पुणे शहरातील पोलिसांच्या सजगतेमुळे आणि सहृदयतेमुळे ही मुलगी सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परतली. पुण्यात पोहोचल्यावर ही मुलगी बुधवार पेठ परिसरात एकटीच फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, चिंता आणि...
दहिसरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिकांशी थेट संवाद; स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन
मुंबई (दहिसर) : आज सकाळच्या मॉर्निंग वॉकदरम्यान दहिसर परिसरात लहान मुलांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटीत नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रलंबित प्रश्न, दैनंदिन समस्या आणि विकासाशी संबंधित अडचणी मोकळेपणाने मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा तसेच नागरी सोयीसुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा स्पष्ट केल्या. यावेळी नागरिकांच्या प्रत्येक मुद्द्याची गांभीर्याने नोंद घेत, दहिसरमधील...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली
पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टुब यांचे भारतात राज्य दौर्यासाठी आगमन; रायसीना डायलॉग 2026 मध्ये प्रमुख पाहुणे
नवी दिल्ली : भारत-फिनलंड द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडला. फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांचे भारतात राज्य दौर्यासाठी आगमन झाले. नवी दिल्लीतील विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष स्टुब यांना आगमनावेळी पारंपरिक पद्धतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री Kirti Vardhan Singh यांनी त्यांचे स्वागत केले. या स्वागत समारंभात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे...
“राज्यसेवेतील खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे!” – आमदार अमित गोरखे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी; उच्चस्तरीय बैठकीची गरज अधोरेखित
मुंबई, विधान भवन :- राज्य शासनाच्या विशेष कोट्यातून थेट नियुक्त झालेल्या आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना गेल्या १२ वर्षांपासून शासनाच्या मूलभूत लाभांपासून वंचित ठेवले जात असल्याने, विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी या अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठवला. गोरखे यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी करत स्पष्ट सांगितले की, "खेळाडूंना सन्मान मिळालाच पाहिजे. त्यांनी देशासाठी योगदान दिले असून त्यांच्यावर...
मुंबईच्या प्रवेशद्वारावर दहिसर टोल प्लाझा परिसरात खड्ड्यांचा फज्जा; नाईक फॅक्टरी आउटलेटजवळ नागरिकांची गैरसोय
मुंबई :- भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच दहिसर टोल प्लाझा परिसरात, नाईक फॅक्टरी आउटलेटजवळ खड्डे भरण्याच्या कामाचा विचित्र आणि निष्काळजी नमुना पाहायला मिळाला आहे. खड्डे भरण्याऐवजी ते जणू औपचारिकता म्हणून भरले गेले असून, पावसाच्या पाण्यामुळे आणि अवजड वाहनांच्या दाबामुळे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा संतापदररोज हजारो वाहनांची वर्दळ...
नगरपालिका-नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा बदल! मतमोजणी पुढे ढकलण्याच्या HC च्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आज अत्यंत मोठी घडामोड पाहायला मिळाली. मतमोजणीला फक्त काही तास बाकी असताना नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्या होणारी मतमोजणी अचानक पुढे ढकलत 21 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निर्णयाचा मोठा परिणाम उमेदवार, पक्ष आणि कार्यकर्त्यांवर होणार असून सर्वत्र या निर्णयाची चर्चा सुरू आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि...
अजितदादा हे विकासाचे चालतं बोलतं विद्यापीठ होतंः आ.अमित गोरखे
प्रतिनिधी | पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे सभागृहात शुक्रवारी (ता. ३०) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या असता, ते जणू पुन्हा एकदा उपस्थित असल्याचा भास निर्माण...









