Breaking News

Home Breaking News Page 251

एक दिवसीय प्रशिक्षणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना कायदेशीर नियमावली व ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

0

पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२५ : लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी निवडणूक काळात केवळ मतदानाच्या दिवशी पुरते आपले कार्य मर्यादित नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सर्व शंकांचे निरसन करून, आत्मविश्वासाने निवडणूक कामकाज पार पाडा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त...

दोषी ठरलेल्या मंत्री माणिकराव कोकाटेंची तात्काळ अपात्रता जाहीर करा; महायुती सरकारवर विरोधकांचा तीव्र हल्लाबोल

0

पुणे | नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने कोकाटेंचा क्रीडा खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत कोकाटेंची तात्काळ मंत्रिपदावरून अपात्रता जाहीर करण्याची मागणी केली आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले आंबादास दानवे यांनी स्पष्ट...

“परवापर्यंतचा हसरा सहवास आज आठवणींतच उरला” – एकनाथ शिंदेंची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली

0

मुंबई | प्रतिनिधी परवापर्यंत ज्यांच्या सहवासात हसणं, चर्चा, निर्णय आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची स्वप्नं होती, त्या सहवासाला आज कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन असंख्य आठवणींच्या कल्लोळात हरवून गेलं, अशा भावनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. “दादांना आदरांजली वाहताना त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, संघर्षाचे दिवस, निर्णयांचे क्षण आणि जनतेसाठी केलेले अथक प्रयत्न...

मुंबईत उष्णतेची लाट; आयएमडीचा यलो अलर्ट, तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

0

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. India Meteorological Department (आयएमडी) ने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान...

मुंबईतील पवित्र बाणगंगा तलावात स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन; राष्ट्रवादी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

0

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबईतील ऐतिहासिक व पवित्र बाणगंगा तलावात विधीवत विसर्जन करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि शांततेच्या वातावरणात हा पवित्र सोहळा पार पडला. श्रद्धा, भक्ती आणि भावनांनी भारलेला क्षण या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दादांवर प्रेम करणारे असंख्य...

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने थेरगाव तसेट रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत मजल्यांच्या बांधकामांवर महानगरपालिकेची निष्कासनाची कारवाई.

0

पिंपरी, दि. १५ जुलै २०२५ : आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अतिक्रमण कारवाईत थेरगाव व रहाटणी येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे  १३,३१५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ८ अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. थेरगाव येथील कारवाईमध्ये ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय...

मुंबईत लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा; भक्तांच्या जल्लोषात गणरायाला भावपूर्ण निरोप

0

मुंबई | देशभरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू मानला जाणारा ‘लालबागचा राजा’ आज अखेर भाविकांच्या जल्लोषात आणि डोळ्यांत पाणी आणणाऱ्या श्रद्धाभावात विसर्जित करण्यात आला. दहा दिवस भक्तिभाव, सामाजिक उपक्रम आणि लाखो भाविकांच्या दर्शनानंतर आज गणरायाला निरोप देताना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” चा गजर सर्वत्र दुमदुमला. भव्य मिरवणूक विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळपासूनच लाखो भाविकांची गर्दी झाली होती. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, भजन, कीर्तन आणि...

“पुण्यातील रस्त्यांची दुर्दशा; विकासाच्या गप्पा हवेत, पण जमिनीवर खड्ड्यांचा महासागर!” पावसाळा संपला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम — नागरिकांचा संताप, निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार

0

पुणे — पुणेकरांच्या संयमाची परीक्षा आता संपत आली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, प्रत्येक गल्लीबोळात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था आणखीच बिकट असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनचालक, पादचारी, विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहिकांपर्यंत — सर्वांनाच या खड्डेमय रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी...

पुणे पोलिसांचा सुवर्णक्षण! शिपाई सुशांत रणवरे यांनी दोन जीव वाचवून घातला मानवतेचा नमुना — ‘खाकी’ची खरी ओळख

0

पुणे शहरातील बाणेर येथील धाडसी व सेवाभावी पोलीस शिपाई सुशांत काशिनाथ रणवरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की पोलिसाची ओळख फक्त कायदा-सुव्यवस्था राखणे नाही, तर संकटात सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे हा देखील त्यांचा जीवाभावाचा धर्म आहे. सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) संध्याकाळी येरवडा येथील गोल्फ क्लब चौकाजवळ अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोसळलेल्या संदीप सावंत (वय ४७) यांना पाहून रणवरे यांनी...

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर गोळीबार; पुण्यातून चार आरोपी अटकेत

0

मुंबई | प्रतिनिधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता अज्ञात व्यक्तीने जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या १० मजली इमारतीबाहेर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई...

Copyright ©