Breaking News

Home Breaking News Page 21

खालापूर पोलीस स्टेशन हदीतील ल्यासन्स च्या नावाखाली अवैद्य भोंगळा कारभार खुलेआम कोणाच्या आशीर्वादाने !!!!!

0

सदर खालापूर पोलीस स्टेशन च्या हदीतील पूनम, स्वागत, समुद्र, आणि साई लीला अश्या नावाजलेले लेडी डान्स बार मध्ये अवैद्या धंध्याचा सुळसुळाट. शासनाने आणि कोर्टाने ठरवून दिलेल्या नियम धाब्यावर ठेउन उन्मत्त होत नाबालिक मुलींवर इंडियन करन्सी भारतीय चलन ची लाखो ची उधळण केली जात आहे. ह्या डान्स बार उनमत चालकांनाच्या प्रवृतीला आळा घालणार तरी कोण ❓❓ ठरवून दिलेल्या वेळेचे आणि...

काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी अटकेत!

0

पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल २०६५ लिटर दारूसाठा जप्त केला आहे. सदर कारवाईत एक आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांनी ही धाडसत्र प्रभावीपणे पार पाडले. दि. ११ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने...

पवना धरणातून विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

0

पिंपरी-चिंचवड : पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून, धरण प्रशासनाने आज (दि. ६ जुलै) सकाळी ८ वाजल्यापासून पवना नदीपात्रात ८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरण पूरनियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार, सध्याचा पाणीसाठा ७४.६४% इतका भरलेला आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची स्थिती...

मुंबई-नागपूर हायवेवर भीषण अपघात – कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचा जागीच मृत्यू

0

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण कबीरपंथीय समाजाला हादरवून सोडले आहे. एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिंपरी बुद्रुक कबीर मठाचे आदरणीय महंत प्रियरंजन दास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. महंत प्रियरंजन दास बंगळुरू येथून १५ दिवसांचा धार्मिक कार्यक्रम संपवून आपल्या मठात...

पुणे महापालिकेत गोंधळ! माजी मनसे नगरसेवक किशोर शिंदे यांचा आयुक्त राम यांच्यावर संताप; “मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!”

0

पुणे, ६ ऑगस्ट २०२५ – पुणे महापालिकेत आज एका धक्कादायक प्रकारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयात धडक दिली. चालू बैठकीतच आयुक्तांवर आरडाओरडा करत "मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!" अशी थेट धमकी दिल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे. ही घटना आयुक्तांच्या कार्यालयात घडली, जेव्हा स्वच्छता मोहीम संदर्भात एक बैठक...

कुणाल कामराला त्याची जागा दाखवत शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल!

0

मुंबई – विनोदी कलाकार आणि स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी त्याचे वक्तव्य थेट शिवसेनेच्या रडारवर आले असून, पक्षाने त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची जागा दाखवली आहे. शिवसेनेने ठाम शब्दांत स्पष्ट केले आहे की, "महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सत्ताधाऱ्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही." शिवसेनेची कडक भूमिका – महाराष्ट्रद्रोही वक्तव्यांना थारा नाही! कुणाल कामरा...

मुंबई सज्ज! मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी महाआंदोलन; पोलिसांना दिलं हमीपत्र, छावणीचे स्वरूप धारण केलेलं आझाद मैदान

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या लढ्याला आता नवी दिशा मिळाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे धडक मोर्चा सुरू केला असून, २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आरक्षणासाठी भव्य आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सध्या ते शिवनेरी येथे दाखल झाले असून उद्या सकाळी ते मुंबईत दाखल होणार...

Vashi ते Sanpada रस्त्यावरील व्हिडीओ व्हायरल, गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर निघाल्याचा प्रकार

0

नवी मुंबईतील वाशी ते सानपदा रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कारच्या डिक्कीतून बाहेर आलेला हात दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.​ व्हिडीओमध्ये एक कार वाशी ते सानपदा रस्त्यावरून जाताना दिसते, आणि तिच्या डिक्कीतून एक मानवी हात बाहेर आलेला स्पष्टपणे दिसतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे की,...

माजी आमदार, शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे निधन; मावळने गमावला एक विचारवंत नेतृत्व

0

पुणे : मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते, शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे (वय ८९) यांचे सोमवारी (दि. ३० जून) रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. द्रष्ट्या नेतृत्वाचा अंत – शिक्षणासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्वकृष्णराव भेगडे हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श नाव होते. त्यांनी शिक्षण प्रसारासाठी झटत...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद; लाखोचा मुद्देमाल जप्त

0

पुणे – बाणेर परिसरातील घरफोडीच्या मालिकांमुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण आणि कसोशीनं केलेल्या तपासातून ५४ लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडी गुन्ह्याचा छडा लावत पाच सराईत आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला सोने, दुचाकी आणि मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  चोरीचा थरार – तपशीलवार हकीगत: दि. ७ जून ते ९...

Copyright ©