Breaking News
काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई! दोन आरोपी अटकेत, ३.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोठी कारवाई करत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम तसेच महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण ₹३,७८,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने करण्यात आली. पहिला गुन्हा : ट्रॅक्टर चोरीचा मोठा प्रकार उघडकीस काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं....
महेश दादा यांनी लोकशाहीच्या मंदिरात मतदानाचा हक्क बजावला
आज, २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महेश दादांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेला प्रोत्साहन दिले. त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन शांततेत मतदान केले आणि मतदारांशी संवाद साधत लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महेश दादांनी म्हटले, “मतदान ही केवळ आपली जबाबदारी नसून आपल्या देशाच्या भवितव्यासाठी एक पवित्र कर्तव्य आहे. प्रत्येक मतदाराने स्वतःहून पुढे येऊन आपला मतदानाचा अधिकार...
अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.’कडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी ₹5,51,101 ची देणगी; समाजकारणाची अनोखी मिसाल!
अमरावती येथे एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग घडला, जिथे ‘अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’च्या वतीने व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भारतप्रकाश खजांची, श्रेणिक बोथरा, शीतलकुमार लुणावत, शिवाजी देठे आणि अनिल उगले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी ₹5,51,101 ची देणगी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये सुपूर्द केली. अतिवृष्टीमुळे नुकत्याच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला आर्थिक मदतीची...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक – आगामी १०० दिवसांसाठी माहिती, तंत्रज्ञान, नगर विकास आणि अन्य विभागांसाठी ठोस कार्ययोजना आखली
मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास - 2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या आगामी १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांची सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रगतीसाठी आवश्यक निर्देश दिले असून ही बैठक महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. नगर...
सैफ अली खानवर हल्ला प्रकरण: ‘पराठा’साठी केलेल्या यूपीआय व्यवहारातून आरोपीचा पोलिसांनी लावला छडा
मुंबईच्या बांद्रा येथील निवासस्थानी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या हल्ल्याप्रकरणी बांगलादेशी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर याला रविवारी अटक करण्यात आली. सैफ अली खान यांना या हल्ल्यात अनेक वेळा चाकूने भोसकण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात पाच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यूपीआय व्यवहार...
पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांची सकारात्मक बैठक
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेऊन पाणी पुरवठा आणि नवीन जलस्रोत निर्मितीवर सखोल चर्चा केली. या चर्चेदरम्यान, शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षित करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारला पाठवलेल्या...
पोलिस परवानगीशिवायही मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा; ९६ लाख बनावट मतदारांच्या मुद्द्यावर राज्यात राजकीय खळबळ
मुंबई: महाराष्ट्रात राजकीय तापमान आणखी चढले आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून, पोलिसांकडून परवानगी न मिळाल्यानेही मोर्चा सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत करण्यात आलेल्या कथित फेरफार आणि बनावट मतदारांच्या समावेशाविरोधात आवाज उठवणे हे आहे. विरोधी...
महागाईचा झटका: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ.
लागणारी किंमत वाढ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी देशभरात LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. वाणिज्यिक सिलिंडरच्या किमतीत 18.50 रुपये वाढ झाली आहे. या वाढीचा फटका मुख्यत: व्यावसायिक ग्राहकांना बसला आहे. तथापि, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. वाढीचे कारण: या किंमत वाढीचा मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आहे, तसेच सरकारी खर्च वाढण्याच्या कारणास्तव...
मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा भव्य पदग्रहण सोहळा संपन्न!
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नवनियुक्त मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांनी आज पदभार स्वीकारला. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यास काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर भर देत नव्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. 🌟 कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धारपदग्रहण सोहळ्यात...
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले. ...
















