Breaking News
भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बस कंटेनरला धडकली; चालक ठार, ८ जखमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने भरधाव वेगाने जात असताना समोर चाललेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ प्रवासी गंभीर तर ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात कसा घडला? घटना लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत किलोमीटर ४९ वर घडली. एसटी बसवरील...
“पुणे: कौसर बाग, एनआयबीएम रोडवरील गॅस गळतीची घटना, एक जखमी”
पुणे – काल रात्री सुमारे ११:४५ वाजता, कोंढव्यातील लाइफलाइफ हॉस्पिटलजवळ कौसर बाग रस्त्यावर गॅस गळती झाल्याचे समजले. रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीने एमएनजीएल लाईनला नुकसान केल्यामुळे गळती झाली होती. अग्निशामक दल आणि एमएनजीएल पथकाने तत्काळ प्रतिसाद दिला आणि तात्पुरती दुरुस्ती करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून, त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी नुकसानाचे...
हिंगोलीतील हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा पुण्यात थरारक शोध – फरासखाना पोलिसांची तत्पर व यशस्वी कारवाई!
पुणे :- हिंगोली जिल्ह्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी पुण्यात मिळून आली असून, तीला सुखरूप शोधून तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्परता, दक्षता आणि संवेदनशीलतेने ही कामगिरी पार पाडली. दिनांक ८ जुलै २०२५ रोजी, पुणे शहरातील रेड अलर्ट एरियामध्ये पायी गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला दत्त मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या फिरताना दिसली....
नागरिकांच्या प्रेमाचे देणे! महेश लांडगे दादांचा भावनिक संवाद — “पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या विश्वासाचा मी सदैव ऋणी राहीन”
पिंपरी चिंचवड | लोकांशी संवाद साधणे हे केवळ जनसंपर्क नाही, तर हृदयातील एक नातं आहे, असे भावनिक शब्द भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी आपल्या नागरिकांसमोर व्यक्त केले. गेल्या दहा वर्षांत नागरिकांनी दाखवलेले प्रेम, विश्वास आणि साथ हीच त्यांची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. महेश लांडगे म्हणाले, “गेल्या दशकभरात मी माझ्या पालकांच्या संस्कारांनी आणि नागरिकांच्या विश्वासाने घडलेलो आहे. त्यांच्या प्रेमाची...
नवी मुंबईत पाच बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटकेत; बनावट कागदपत्रांचा वापर उघड
नवी मुंबई पोलीस दलाच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) रविवारी सकाळी पनवेलमधील करंजाडे भागात टाकलेल्या छाप्यात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या विशेष कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले, त्यामध्ये दोन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश होता. प्राथमिक चौकशीनंतर पाच प्रौढांना अटक करण्यात आली असून, सहा वर्षीय...
महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे
मराठी भाषा सर्वांत उत्तम आणि समृद्ध भाषा आहे.... तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथे राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला. मराठीबद्दल बोलले की तुम्ही म्हणणार हे संकुचित विचारधारा आहे. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल वाटते, जगातील सर्वांत मोठा पुतळा त्यांना गुजरातमध्ये बांधा वासा वाटतो, गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी वाटत असेल, हिऱ्यांचा...
सराईत वाहन चोराकडून एकूण ०६ मोटार सायकल जप्त करण्यात आले यश.
खडक पोलीस स्टेशनचे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. अनिल सुरवसे, प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार...
सहा महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ याला अत्यंत शिताफीने अटक केली आहे. स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेची पार्श्वभूमी दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता, हडपसर येथील शिंदे...
न्यायाधीशांनी iX Global विरुद्धच्या SEC खटल्यास फेटाळले, $1.8 मिलियन शुल्क भरण्याचे आदेश दिले.
संघीय न्यायाधीशांनी iX Global आणि डिजिटल लायसेंसिंग, ज्याला डेट बॉक्स म्हणून ओळखले जाते, यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. हा नागरिक खटला युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) ने आणला होता. युएस डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ युटाच्या न्यायाधीश रॉबर्ट शेल्बी यांनी SEC ला अंदाजे $1.8 मिलियन वकिल आणि रिसीव्हरशिप शुल्क भरण्याचे आदेश दिले. मे 28 रोजी जारी केलेल्या...
आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सेजल मोईकरचा सन्मान; इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून ५१ हजारांचा धनादेश प्रदान.
मावळ तालुक्याच्या सुवर्ण कन्या सेजल मोईकरचा गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून सेजलने मावळ तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. सुधावडीसारख्या छोट्या गावातून आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या सेजल मोईकरने हा यशाचा सोपान गाठल्याने तिचा हा संघर्ष आणि जिद्द प्रेरणादायी आहे. सेजल ही, ला फिटनेस जिमची खेळाडू असून, ती...













