पुणे

Home पुणे Page 152

परराज्यातून येऊन पुण्यात गांजाची विक्री करणारा इसम जेरबंद – पोलीस तपास सुरू

0

पुणे – पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीस आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत कडक कारवाई केली जात असून, अशाच एका मोठ्या कारवाईत परराज्यातून आलेल्या इसमाला गांजाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. स्वारगेट परिसरात हॅण्डल्युम हाऊस शॉपसमोर सार्वजनिक रस्त्यावर कारमध्ये संशयास्पदरीत्या बसलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. झडती घेतली असता तब्बल ६० किलो ०६७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात...

८ वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी गुन्हेगाराला पुणे पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! तीन आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई

0

पुणे : पुणे शहरातील घरफोडी गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आणि पोलिसांच्या अभिलेखावर "पाहिजे" असलेल्या तिघा गुन्हेगारांना अखेर गुन्हे शाखा युनिट ५ च्या सतर्क पथकाने रामटेकडी, हडपसर परिसरातून अटक केली. विशेष बाब म्हणजे प्रमुख आरोपी बिरजुसिंग रजपुतसिंग दुधाणी हा तब्बल ८ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता, आणि आता तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक श्री....

पोलीस रेकॉर्डवरील ‘चोर राजा’ गजाआड; ८ घरफोडी गुन्ह्यांचा पर्दाफाश! सोनारालाही अटक

0

पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारीच्या साखळीत मोठा खंड पडला असून, 'चोर राजा' म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपुल या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीकडून तब्बल ८ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सोनारालाही अखेर अटक करण्यात आली आहे. ही धडाकेबाज कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली आहे. मा....

पुणे मेट्रो मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर वेल्डिंगदरम्यान लागलेल्या आगीनं धुराचे लोट; पाच अग्निशमन गाड्यांच्या मदतीने पाच मिनिटांत आग आटोक्यात.

0

पुणे: मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेल्या फोम मटेरियलला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. पुणे अग्निशमन विभागाने तत्काळ पाच अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले आणि अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. वेल्डिंगदरम्यान लागली आग प्राथमिक माहितीनुसार, स्टेशनच्या कामादरम्यान वेल्डिंगचे काम...

धक्कादायक! महिला डॉक्टरची गाडीत आत्महत्या; सांगली जिल्हा हादरला, निलम गोऱ्हेंची पारदर्शक चौकशीची मागणी

0

सांगली | सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात एका महिला डॉक्टरने आपल्या चारचाकी गाडीतच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. शुंभागी समीर वानखडे (मु.रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या मूळच्या मुंबईतील रहिवासी होत्या. गाडीतच सापडल्या रक्ताच्या थारोळ्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. शुंभागी वानखडे यांनी ब्लेडच्या सहाय्याने हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून आत्महत्या केली. त्या घरातून "दवाखान्यात...

२४ तासांत खुनाचा उलगडा | आंबेगाव पोलिसांची गतीमान कारवाई -“जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून; आरोपी २४ तासांत इंदौरहून अटकेत!”

0

पुणे | आंबेगाव पोलीस स्टेशन – पुणे शहरात एका तरुणाचा थरारक खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत शोधून काढत आंबेगाव पोलिसांनी एक उदाहरणीय कामगिरी बजावली आहे. आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईने तो अखेर गुन्ह्यातील कबुली देत गजाआड गेला. दिनांक १४ जून २०२५ रोजी, जांभुळवाडी तलावाच्या बांधावर, एक तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत गोपनीय...

एक वर्ष जुनी बोलेरो पिकअप चोरी उघडकीस! वाघोली पोलिसांच्या सतर्क कारवाईत सराईत आरोपी जेरबंद

0

पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने एक मोठी कामगिरी करत लोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोचा छडा लावला आहे. या कारवाईत रामनगर, वारजे माळवाडी येथील रहिवासी सुनिल आण्णा कांबळे (वय ४०) या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटना घडली कशी? दि. १९ जून २०२५ रोजी, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या...

निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग उघड; येवलेवाडीमध्ये संशयित वाहनांतून रोख रक्कम व प्रचार साहित्य जप्त

0

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत आचारसंहितेच्या भंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस व भरारी पथकाच्या (FST) सतर्कतेमुळे संशयित दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता बधे स्टील, खडीमशीन चौक परिसरात...

बांगलादेशातून बोलावून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची धडक कारवाई

0

पुणे शहरात पुन्हा एकदा मानव तस्करी व वेश्याव्यवसायातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिसांनी केलेल्या तात्काळ आणि काटेकोर कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीला अमानवी मार्गाने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निर्भय कार्यवाही करत बांगलादेशातून बोलावून मुलीला जबरदस्तीने बेंगळुरूमध्ये व नंतर पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश केला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना ऊर्फ पारुल...

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट – सिम्बायोसिस विद्यापीठातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे निरीक्षण

0

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आणि युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्री 4.0 आणि डिजिटल स्किल्सच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही मान्यवरांनी केंद्रातील प्रयोगशाळा,...

Copyright ©