महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांना अखेरचा निरोप; बारामतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती
बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज बारामती, पुणे येथे देशपातळीवरील राजकीय नेतृत्व उपस्थित राहिले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नितीन नबीन यांनी बारामतीत दाखल होत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते....
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्न
पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव युवराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे तर नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस...
एसटीला डिजिटल सुरक्षा कवच; ६३३ ठिकाणी ७०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, ₹१११ कोटींच्या प्रकल्पाला वेग
१७ फेब्रुवारी २०२६ | 📍 मंत्रालय, मुंबई राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून Maharashtra State Road Transport Corporation (एमएसआरटीसी) ने महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य...
मुंबई पोलीस दलात ४०० अत्याधुनिक वाहनांची भर; जलद प्रतिसाद व नागरिकांच्या सुरक्षेला नवे बळ
मुंबई | मुरली देवरा चौक, नरिमन पॉईंट : मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिक प्रभावी, तत्पर पोलीस प्रतिसादासाठी Mumbai Police दलात ४०० अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा मुरली देवरा चौक येथे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी अनेक मान्यवरांना लाभली. या आधुनिक वाहनांमध्ये प्रगत कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस ट्रॅकिंग, उच्च...
*भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ‘तालिका सभापती’ पदी निवड*
पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी सभागृहात केली. या निवडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले : *"मा. सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि...
झारखंड मुख्यमंत्रीपदाची शपथविधी २६ नोव्हेंबर रोजी; हेमंत सोरेन चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार.
झारखंडच्या मुख्यमंत्रिपदावर हेमंत सोरेन यांची चौथ्यांदा निवड; २६ नोव्हेंबरला भव्य शपथविधी समारंभ झारखंड मुक्ति मोर्चाचे (JMM) नेते हेमंत सोरेन २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. चौथ्यांदा मुख्यमंत्री होणाऱ्या सोरेन यांच्या शपथविधी समारंभात विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. भव्य शपथविधी सोहळ्यात दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी INDIA आघाडीतील...
ऐतिहासिक निर्णयाने ठाकर वाडीत आनंदाचा शिडकावा; पाच पिढ्यांच्या संघर्षाला मिळाला कायदेशीर हक्क!
वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला न्याय मावळ तालुक्यातील ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे येथील आदिवासी कुटुंबांना अखेर त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे या कुटुंबांना ३/२ कायद्यानुसार कायदेशीर हक्क बहाल करण्यात येणार आहेत. शेकडो वर्षांच्या वाटचालीत जे शक्य झालं नाही, ते महसूल विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून शक्य झालं...
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णतेच्या उंबरठ्यावर; घाटातील अपघात व वाहतूक कोंडीला मिळणार कायमचा दिलासा
मुंबई–पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील सर्वात महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता पूर्णत्वास येत असून या प्रकल्पाचे तब्बल ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन १ मे रोजी Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बोरघाट व खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी, अपघात आणि विलंबाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचा...
श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासाला गती; नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनाची घोषणा!
धाराशिव (१७ जून): महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १,८६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी तुळजापूर विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली. या बैठकीस आमदार कैलास...
कर्नाटकात गणेशोत्सवावर काँग्रेस सरकारची गंडांतरकारक कारवाई – गणेशमंडप हटवला, हिंदू समाजात संतापाची लाट!
बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हिंदू समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेश चतुर्थी साजरी करण्यावर काँग्रेस सरकारने बंदी आणली असून, याविरोधात संतापाचा ज्वालामुखी उफाळून आला आहे. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले गणेशोत्सव मंडप पोलिसांच्या मदतीने तोडण्यात आले. बेंगळुरूमधील एका भागात भक्तांनी उभारलेला गणेशाचा पंडाल पोलिसांनी जबरदस्तीने उखडून टाकल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हिंदू भाविकांनी प्रश्न उपस्थित...







