महाराष्ट्र
अकोला पोलीस सज्ज! कावड पालखी उत्सवासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची सार्वजनिक मंडळांसोबत बैठक
"शांततेचा संदेश, सुरक्षिततेची हमी!" आगामी कावड पालखी उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील उत्साही वातावरणात सुरक्षा आणि समन्वयाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक (IPS) (@archit.59) यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक कावड पालखी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती लक्षणीय होती. मंडळांशी संवाद साधताना श्री. चांडक यांनी त्यांच्या...
मीरा रोड येथे कार भाड्याने देण्याच्या आमिषाने तब्बल १३७५ लोकांची २० कोटी रुपयांची फसवणूक!
मीरा रोड | ठाणे जिल्हा :- मीरा रोड परिसरात एक भव्य कार रेंटल घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात तब्बल १३७५ नागरिकांची सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कार भाडे देतो म्हणत लोकांना गंडवले; लाखो रुपयांची गुंतवणूक वाया फसवणूक करणाऱ्या आरोपींनी "कार भाड्याने द्या आणि कमवा" अशा आमिषाने नागरिकांना...
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा – कुणाल कामराच्या बँक खात्याची चौकशी होणार!
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टिप्पणीवरून मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकरणी कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले आहे. कामराच्या संपत्तीचा शोध – किती आहे नेटवर्थ? मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामरा हा कोट्यधीश असून, स्टँडअप कॉमेडी, यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी...
उंद्री–हांडेवाडीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा; राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती बांदल यांची १२ पाण्याच्या टाक्यांची महत्त्वाकांक्षी योजना
पुणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या दक्षिण उपनगरांमध्ये गंभीर बनलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता मोठा उपाय सुचवण्यात आला आहे. Nivrutti Bandal यांनी उंद्री, हांडेवाडी, पिसोली, ऑटाडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी आणि उंद्री हिलटॉप परिसरातील लाखो नागरिकांना दिलासा देण्यासाठी किमान १२ उंच पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त Naval Kishore Ram यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलच्या...
बनावट MHADA वेबसाइटद्वारे लॉटरीत घर मिळवून देण्याचे आमिष, मुंबईत दोन जण अटकेत.
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) बनावट पोर्टलद्वारे लोकांना फसवून घर देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर पोलिसांनी शनिवारी दोन जणांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट वेबसाइटवर पेमेंट लिंक देखील अपलोड केली होती, ज्यामुळे सुमारे १५ जणांना फसवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या फसवणुकीची एकूण रक्कम सध्या ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे, परंतु ती वाढण्याची शक्यता...
मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई; सार्वजनिक ठिकाणी नियम तोडणाऱ्यांवर न्यायालयात खटले दाखल, हजारो रुपयांचा दंड व कारावासाची शिक्षा
पुणे | मुंढवा :– सार्वजनिक ठिकाणी अनुशासनभंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्याकडून जोरदार मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, ज्वालाग्राही पदार्थांचा वापर, आणि विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ-५) आणि सहा. पोलीस...
पुणे विमानतळावरून थेट दुबई आणि बँकॉक उड्डाणे सुरू; आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढली! पुणे विमानतळ ASQ क्रमवारीत 74 व्या स्थानी पोहोचले.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: दुबई आणि बँकॉकसाठी थेट उड्डाणे सुरू! पुणे विमानतळावरून थेट दुबई आणि बँकॉक या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाणांची सुरुवात झाली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या नवीन उड्डाणांबद्दल माहिती दिली. या नवीन उड्डाणांमुळे आता पुणे तीन आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांशी – दुबई, बँकॉक आणि सिंगापूर – थेट जोडले गेले आहे. उड्डाण वेळापत्रक: पुणे-दुबई (रोज): पुण्याहून उड्डाण: सायं. 5:40...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सपत्नीक शासकीय महापूजा; आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तिभावाने नमतं स्तक
पंढरपूर (दि. ६ जुलै): आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत हरिनामाच्या गजरात भक्तिभावाने न्हालेलं वातावरण पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस यांच्यासह सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा करून राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि पोशाख अर्पण करण्यात आला. पूजेचा संपूर्ण...
पुणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : दरोड्याचा कट उधळून तिन्ही सराईत गुन्हेगार जेरबंद
पुणे :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन हायअलर्टवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर युनिट २ गुन्हे शाखेने धाडस दाखवत मुंढवा परिसरात दरोड्याचा कट उधळून तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. २५ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हे शाखा युनिट २ चे पथक भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार शंकर नेवसे यांना गुप्त...
विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर बंदी; पुणे पोलीस आयुक्तालयाचा महत्वाचा आदेश | विमान सुरक्षेसाठी मोठा निर्णय
पुणे शहर पुणे विमानतळाजवळच्या परिसरातील कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटवर ६० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.हा निर्णय पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार घेतला असून, लोहगाव विमानतळाच्या १५ कि.मी. परिघात तो लागू राहणार आहे. का झाला निर्णय? भारतीय वायुसेनेने पुणे...









