महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 212

लिफ्टच्या बहाण्याने अपहरण, हत्या करण्याची धमकी देत जबरी चोरी; गुन्हे शाखा युनिट-४ ची धडक कारवाई, तिघे आरोपी जेरबंद

0

पुणे : “लिफ्ट देतो” असे सांगून वाहनात बसवायचे, त्यानंतर अपहरण करून मारहाण व जीव घेण्याची धमकी देत जबरी चोरी करायची — अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सात लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण...

दिवाळीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांच्या काळात तब्बल ५ हजार ६५८ टन कचरा संकलित केला आहे. दिवाळीच्या काळात घराघरात करण्यात येणारी साफसफाई , बाजारपेठांतील गर्दी, फटाक्यांचा कचरा आणि सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

0

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. दि. ०२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ कडील अधिकारी व अंमलदार वरिष्ठांच्या आदेशानुसार पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दांडेकर...

सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत होळी साजरी; एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा रंगोत्सव

0

मुंबई : होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकतेचा ओलावा जपणारा मंगलमय सोहळा आहे. आयुष्यातील दुःख, चिंता आणि तणाव विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याची भावना व्यक्त करत यंदाची होळी सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध राज्यांतून आलेले Central Industrial Security Force...

पैशांच्या वादातून मित्राचाच खून; १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश

0

पुणे : पैशांच्या लालसेपोटी मित्रालाच संपवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अवघ्या १२ तासांच्या आत खुनातील सर्व आरोपींना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या जलद कारवाईमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर असलेला पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गु.र.नं. २७/२०२६ भा.न्या.सं.क. १०३(१) या...

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टुब यांचे भारतात राज्य दौर्‍यासाठी आगमन; रायसीना डायलॉग 2026 मध्ये प्रमुख पाहुणे

0

नवी दिल्ली : भारत-फिनलंड द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडला. फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांचे भारतात राज्य दौर्‍यासाठी आगमन झाले. नवी दिल्लीतील विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष स्टुब यांना आगमनावेळी पारंपरिक पद्धतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री Kirti Vardhan Singh यांनी त्यांचे स्वागत केले. या स्वागत समारंभात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे...

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे

0

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली. शहर सुधारणा समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील...

ठरलं! १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर – ५ फेब्रुवारीला मतदान

0

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असतानाच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. या घोषणेमुळे गावोगावी प्रचारसभा, बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य...

पिंपळे निलखमध्ये दिवाळी साजरी नारीशक्तीच्या सन्मानासह! कै. प्रभाकर साठे मेमोरियल फाउंडेशनतर्फे ‘भाऊबीज २०२५’ महिला स्नेह सोहळा उत्साहात पार

0

पिंपळे निलख (पिंपरी-चिंचवड) : दिवाळीच्या आनंदी वातावरणात पिंपळे निलख परिसराने नारीशक्तीला सन्मान देणारा उपक्रम साजरा केला. कै. प्रभाकर नारायणराव साठे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने “भाऊबीज २०२५ महिला स्नेह सोहळा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पिंपळे निलख येथील मनपा शाळेसमोरील मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील हजारो नागरिक, विशेषतः महिला भगिनी मोठ्या...

“राणेंना ओवैसी खिशात टाकेल?” – AIMIM नेता इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय तापमान चढले!

0

राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्याने नवीन राजकीय खळबळ उडवली आहे. “ओवैसी सहजपणे राणेंना आपल्या खिशात टाकून देईल,” असे त्यांनी केलेले विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. इम्तियाज जलील यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी AIMIM आणि जलील यांच्यावर जोरदार टीका सुरू केली. अनेकांनी...

Copyright ©