Breaking News

Home Breaking News Page 40

मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

0

मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...

ताडगोळे गटारात धुतले; खेडमध्ये विक्रेत्यावर गुन्हा दाखल

0

खेड (पुणे): तालुक्यातील एका बाजारपेठेत परप्रांतीय विक्रेत्याला स्थानिक तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गटारात जबरदस्तीने ताडगोळ्यांसह धुतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, संबंधित विक्रेत्याच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाजारपेठ परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ताडगोळ्यांची विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीला काही स्थानिकांनी ‘बिनपरवानगी व्यवसाय...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या 14 मालमत्ता केल्या जप्त

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ही जप्ती मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत आहेत. गुरुवार (20 मार्च) रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी थेट महानगरपालिका कार्यक्षेत्रात चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड झोनमधील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक  थकबाकीदारांच्या...

कुंडमाळा दुर्घटना : आमदार सुनील शेलके यांनी अथर्व हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन दिला आधार; उपचारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

0

तळेगाव दाभाडे | १६ जून २०२५ :- कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण मावळ परिसर शोकाकुल झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर तळेगाव दाभाडे येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज मावळचे आमदार श्री. सुनील शेलके यांनी वैयक्तिकरित्या हॉस्पिटलला भेट देत प्रत्येक जखमी रुग्णाची विचारपूस केली, त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून...

बॉम्बे हायकोर्टचा महाराष्ट्र सरकार व सिंहगड कॉलेजवर जोरदार हल्लाबोल; विद्यार्थिनीला परत शिक्षणाचा अधिकार, परीक्षेस बसण्याची मुभा

0

पुणे | २८ मे २०२५ — ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात इंस्टाग्रामवर टीका करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक करून तिला शिक्षण आणि परीक्षा देण्यापासून रोखणाऱ्या कारवाईवर बॉम्बे हायकोर्टाने जोरदार फटकारा दिला आहे. न्यायालयाने विद्यार्थिनीच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाल्याचे सांगत तिला परीक्षा देण्यास परवानगी दिली असून, कॉलेजला तिच्या निलंबनाचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर टीका, नंतर अटक सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील ही...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनीषा भोसले यांचा मृत्यू.

0

पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (दि. २५) भीषण अपघातात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी मनीषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महांकाळ, सांगली) यांचा मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालुक्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली येथे आपल्या भावाकडे आल्या होत्या....

अफू आणि दोडा चुरासह मोठा अंमली पदार्थ साठा हस्तगत; कोंढवा पोलिसांची कारवाई

0

कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अफू आणि दोडा चुरासह एक इसम जेरबंद केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे पुणे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे. यश कॉम्प्लेक्ससमोर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक संशयित इसम दिसून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अफू...

मराठा समाजासाठी ऐतिहासिक विजय! महायुती सरकारचा आरक्षणविषयक निर्णय लागू, ग्रामपातळीवर कुणबी प्रमाणपत्रासाठी मार्ग मोकळा

0

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दशकांपासून चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. आज महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्या असून, हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाने सातत्याने आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मागे सामाजिक न्याय, आर्थिक उन्नती आणि समान संधी सुनिश्चित करण्याची महत्त्वाची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री...

भावना, श्रद्धा आणि अस्तित्व पायदळी तुडवणारा विकास नको! आमदार अमित गोरखेंचा विधान परिषदेत जोरदार विरोध; नवीन डीपी आराखडा रद्द करण्याची ठाम मागणी

0

मुंबई | २ जुलै २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्याविरोधात विरोधाचा सूर आता अधिक तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आळंदी येथे प्रस्तावित कत्तलखान्याची योजना रद्द केल्यानंतर, या आराखड्याला विरोध करणाऱ्या आवाजात आणखी बळ भरलं आहे. याच पार्श्वभूमीवर, विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा संपूर्ण डीपी आराखडा रद्द करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी...

“कंगना रनौतला चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा कर्मचाऱ्याने थप्पड मारली”

0

बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांनी गुरुवारी आरोप केला की चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा अधिकाऱ्याने त्यांना थप्पड मारली, तेव्हा त्या दिल्लीला प्रवास करत होत्या. रनौत यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंग पॉइंटकडे जात असताना, फ्रिस्किंग क्षेत्रात तैनात असलेली CISF महिला अधिकारी कुलविंदर कौर यांनी त्यांच्याशी वाद घातला आणि थप्पड मारली. सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमधील शेतकरी...

Copyright ©