Breaking News

Home Breaking News Page 302

पुण्यात उंद्री रस्त्यावर भीषण अपघात टळला; महिला आणि लहान मूल थोडक्यात बचावले, रहिवाशांनी PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी

0

उंद्री (पुणे) – उंद्रीतील नायटी इस्टेट ते कंट्री क्लब दरम्यान मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एक महिला आणि तिचे लहान मूल थोडक्यात जीव वाचवून बचावले. पाण्याचा टँकर जोरात धडक दिल्याने त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पडली. काही सेंकदांचाच फरक होता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे पुन्हा एकदा उंद्री परिसरातील बेकायदेशीर बांधकामं, रस्त्यांवरील अतिक्रमणं आणि बिनधास्त...

पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकासकामांना गती; गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर पूर्णतेवर भर

0

पुणे : पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि शहरी सुविधा यांसारख्या क्षेत्रांतील प्रकल्पांवर विशेष चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्ह्याचा विकास हा केवळ वेगवान नव्हे, तर गुणवत्तापूर्ण आणि नियोजित पद्धतीने झाला...

परिवहन वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू

0

पुणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस तसेच अॅम्ब्युलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. या नव्या मालिकेमुळे वाहनधारकांना त्यांच्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्या वाहनधारकांना खास व लक्षवेधी नोंदणी क्रमांक हवा आहे, त्यांनी विहित शुल्क (तीनपट किंवा नियमित शुल्क) भरून अर्ज करावा. यासाठी...

कष्टकऱ्यांचे बुलंद नेतृत्व डॉ. बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा, आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन PCMC’ला नवे बळ

0

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय विश्वात खळबळ उडवणारी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरणारी मोठी घडामोड समोर आली आहे. कष्टकरी, रिक्षा चालक, असंघटित कामगार आणि बहुजन वर्गाचे बुलंद व लढाऊ नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉ. बाबा कांबळे यांनी भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे. २०२६ च्या महापालिका...

“पिंपरी-चिंचवडमधील कारभारी बदला… शहराला नवा श्वास द्या!” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी-चिंचवडकरांना थेट आवाहन

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट टाकण्यासारखे प्रकार, लाचप्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाची अटक, कोयता गॅंगचा उच्छाद – अशा अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर बोट ठेवण्याऐवजी, यात सुधारणा घडवून आणण्यासाठी “शहरातील कारभारी बदला” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…

0

पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’,...

हडपसर १५ नंबर चौकात धक्कादायक प्रकार; क्रेडिट कार्ड थकबाकीवरून फायनान्स एजंटकडून पतीला पत्नीसमोर बेदम मारहाण

0

पुणे | हडपसर : पुण्यातील Hadapsar परिसरातील १५ नंबर चौकात एक धक्कादायक घटना घडली असून खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांनी क्रेडिट कार्ड थकबाकीच्या कारणावरून एका व्यक्तीला भररस्त्यात त्याच्या पत्नीसमोर बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर काही महिन्यांपासून क्रेडिट कार्डचे थकीत पैसे होते. या थकबाकीची वसुली...

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारा आरोपी २ तासांत जेरबंद, ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करत ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. दिनांक १२/०२/२०२६ रोजी फिर्यादी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे २,९०,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोणी काळभोर...

सहकारनगर पोलिसांची कारवाई; बसमधील महिलांचे दागिने चोरणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद, २.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून २,०२,००० रुपये किंमतीची सोन्याची बांगडी जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. दि. ०९/०९/२०२६ रोजी फिर्यादी महिला भोसरी बस स्टॉप ते बालाजीनगर बस स्टॉप असा पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या...

पुण्यातील कॅनरा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला; २४ तासांत विधीसंघर्षित बालक ताब्यात, गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कारवाई!

0

पुणे | मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखा युनिट ६ ने अवघ्या २४ तासांत एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेऊन मोठा गुन्हा उधडकीस आणला. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपास कौशल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. घटनेचे सविस्तर विवरण दि. १३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री मांजरी खुर्द येथील कॅनरा बँक शाखेचे बाहेरचे शटर...

Copyright ©