Breaking News

Home Breaking News Page 25

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन; कोल्हापूरमध्ये भव्य स्वागत-सत्कार!

0

कोल्हापूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैजारवाडी, कोल्हापूर येथील जगद्गुरु दत्त चिले महाराज मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या पवित्र दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरमधील विविध कार्यक्रर्यांमध्ये सहभाग घेतला. आज संध्याकाळी ७.३५ वाजता कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर भाजपा महिला...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात टळला; झाड कोसळले तरी उद्योजक बचावले!

0

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत हॉटेलसमोर एक धक्कादायक प्रकार घडला. आज मंगळवारी (ता. २२ जुलै) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास, रस्त्यालगत लावलेल्या एका चारचाकी वाहनावर अचानक झाड कोसळले. ही चारचाकी आळंदी म्हातोबा येथील युवा उद्योजक केतन मच्छिंद्र जवळकर यांची असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन पार्क करत असतानाच अचानक गुलमोहराचे एक प्रचंड झाड त्यांच्या गाडीवर कोसळले....

पुणे पोलीस सज्ज: ऐतिहासिक श्री गणेशोत्सव २०२५ सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

0

पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मकतेचा महामेळावा. जगभरात कीर्ती पावलेला पुण्याचा "श्री गणेशोत्सव" यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान साजरा होणार असून, त्याची सांगता ६ व ७ सप्टेंबर रोजीच्या भव्य मिरवणुकांनी होणार आहे. पुण्यात यंदा तब्बल ३,९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि ७४,५९४ खाजगी गणेश मंडळे नोंदणीकृत असून, लाखो भाविक पुण्यासह...

कात्रज परिसरात १७ एप्रिलला पाणीपुरवठा बंद; महत्त्वाच्या पाईपलाइनच्या दुरुस्तीमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा – पुणे मनपाचा इशारा

0

पुणे : पुणे शहरातील कात्रज आणि परिसरातील नागरिकांना १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. पुणे महापालिकेच्या जलविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगम मंदिराजवळील मोठ्या दाबाच्या पाईपलाइनमध्ये गळती आढळल्यामुळे त्या ठिकाणी अत्यावश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याचबरोबर राजमाता सबवेच्या परिसरातही संरचनात्मक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होणार आहे. महापालिकेच्या जलविभागाने सांगितले की, १८ एप्रिल रोजी...

देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार भक्तीसिंग दुधानी जेरबंद

0

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई करत, देशी बनावटीच्या पिस्तुलासह फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई करून परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेला खतपाणी घालणाऱ्या गुंडाला पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी (Bhaktisingh Deepaksingh Dudhane) असून, तो स्वारगेट परिसरात देशी...

कोंढवा पोलीस स्टेशनच्या युनिट-०५ पथकाने रेकॉर्डवरील आरोपीस गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह पकडले

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कोंढवा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या युनिट-०५ पथकाने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह एक गंभीर आरोपी जेरबंद केला आहे. दि. २४ एप्रिल २०२५ रोजी, गस्तीदरम्यान पोलीस अभिलेखावर असलेल्या आरोपी मौला ऊर्फ मौलाना रसुल शेख (वय २२ वर्षे, रा. माऊली कृपा बिल्डींग, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले.  गोपनीय माहितीवरून कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-०५ च्या पोलीस स्टाफला गोपनीय...

हिंजवडी आयटी पार्क व पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या विकास कामांना गती! स्थानिक समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश

0

पुणे | पुण्यातील माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र समजल्या जाणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी आयटी पार्क' परिसरात उद्भवणाऱ्या स्थानिक समस्या आणि प्रलंबित विकासकामांची आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर पाहणी केली. यावेळी पुणे मेट्रो मार्गिका - ३ अंतर्गत असलेल्या विविध स्थानकांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.  पाहणी दरम्यान घेतलेल्या ठिकाणांचा आढावा: स्थानक क्र. ०६ - क्रोमा (हिंजवडी फेज ३) स्थानक क्र. ०३...

पुणे पोलीसांची मोठी कामगिरी : चैन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद – मुद्देमालासह हस्तगत

0

पुणे – पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याचा ठोस पुरावा म्हणूनच अलीकडेच घडलेल्या घटनेत, केसनंद रोड, वाघोली येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या आरोपीस केवळ ४८ तासांत युनिट ६ गुन्हे शाखेने अटक करून सोन्याचा मुद्देमाल व मोटारसायकल हस्तगत केली आहे. घटनेचा तपशील एक महिला पायी जात...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई – वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड! दोन चोरांना अटक, चोरीच्या दुचाकी जप्त

0

पहिली कारवाई – चोरीची स्प्लेंडर विक्रीसाठी येणार, सापळा रचून अटक! पोलीस अंमलदार सचिन पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पेरणे फाटा, लोणीकंद येथे सापळा रचण्यात आला. आरोपी दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. न्हावरा, शिरूर, पुणे) याला हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह पकडण्यात आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर गाडीच्या नंबरवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये नोंद झालेला गुन्हा असल्याचे उघड...

“चार दंडके ठोका… नालायक आहे तो!” – डॉ. धनंजय देशपांडे यांचा ‘डिजिटल अरेस्ट’ फ्रॉडवर मार्मिक सल्ला; पोलिस अधिकारीही खळखळून हसले!

0

सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयावर देशभरात जनजागृतीची गरज असताना, धुळे शहरात नुकतीच भारतातील पहिली 'सायबर कॉन्क्लेव्ह'- एक राष्ट्रीय परिषद-यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड. चैतन्य भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सभागृह हाऊसफुल्ल होता, आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमात ऊर्जा आणि उत्सुकता यांचा उत्स्फूर्त संगम पाहायला मिळाला. या कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. धनंजय देशपांडे (DD) यांचे अनुभव, उपक्रमशील विचार आणि त्यांची...

Copyright ©