Breaking News
पुणे पोलिसांची मोठी कारवाई – अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १६.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | शहरात अंमली पदार्थांच्या साखळीविरोधात मोठी कारवाई करत पुणे पोलिसांनी एक मोठी टोळी जेरबंद केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरात सापळा रचून एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांची माहिती व १६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल उघडकीस आला आहे. स्वारगेट येथे संशयिताची बॅग तपासली असता गांजा आढळला दि. १९ जून २०२५ रोजी, पोलीस अंमलदार राहुल...
दुर्मीळ श्वसनमार्गातील हेमॅन्जिओमावर वेळेत उपचार; ८ महिन्यांच्या चिमुकलीला मिळाले नवे जीवन
मुंबई | १९ डिसेंबर – जन्मापासून श्वास घेण्यास त्रास सहन करणाऱ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला मुंबईतील नारायण हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान व उपचारामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. या बालिकेला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ठरू शकणाऱ्या ग्रेड-३ एअरवे हेमॅन्जिओमा या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिच्या श्वसनमार्गात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, तिला श्वास घेण्यास तीव्र अडचण,...
पुणे महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; NCP व NCP (SP) मधील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे | प्रतिनिधी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट – NCP SP) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांतील अनेक माजी नगरसेवक व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, राज्य आणि केंद्रात भाजप व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष असले तरी पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर...
छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोड; काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – शहरातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण करणारी घटना समोर आली असून, काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रशीद मामू व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात जाहीर स्वागत...
वाकडच्या डांगे चौक ते भुमकर चौक रस्ता रुंदीकरणास गती; काळाखडक येथील ९६ अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड | १६ जुलै २०२५ – शहरातील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वाकडमधील डांगे चौक ते भुमकर चौक या ४५ मीटर रुंदीच्या नियोजित रस्त्यावर अडथळा ठरत असलेल्या ९६ झोपड्यांवर काल महापालिकेने मोठी निष्कासन कारवाई केली. कारवाईचे तपशील: ▪️ काळाखडक झोपडपट्टीत २५० मीटर लांबी व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर ही कारवाई▪️ सुमारे ४६...
पुणे रेल्वेचा ५ वर्षांचा मास्टर प्लॅन जाहीर; ६ नवे प्लॅटफॉर्म, ६० अतिरिक्त गाड्या आणि २ सॅटेलाइट स्टेशन उभारणार
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाकांक्षी ५ वर्षांचा मास्टर प्लॅन आखला असून, त्याअंतर्गत शहराच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडणार आहेत. या योजनेमुळे पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता दुप्पट होणार असून, दररोज हजारो प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे. या मास्टर प्लॅननुसार पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याबरोबरच ६ नवे प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. सध्या...
पुण्यातील वाहतूककोंडीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दौरा रद्द – शहराच्या मध्यवर्ती वाहतूक समस्येवर बोगदा प्रकल्प प्रस्तावित
पुणे, २३ जून २०२५ – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूककोंडीची तीव्रता आज पुन्हा एकदा दिसून आली, जेव्हा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्तावित बोगदा प्रकल्पाच्या स्थळाला भेट देण्याचा दौरा वाहतूक कोंडीमुळे अर्धवट सोडावा लागला. या दौऱ्याचे आयोजन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार हेमंत रासने यांच्या विनंतीवरून करण्यात आले होते. गडकरी हे सकाळच्या गर्दीच्या वेळेस शनिवार पेठेतील शनिवारवाडा...
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेचा जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळला; गंभीर पुरावे, पीडितेच्या जीवाला धोका असल्याचे मत
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आता नवा वळण आला आहे. या खळबळजनक घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे आरोपीच्या अडचणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दिनांक २५ जून) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली होती. स्वारगेट बस स्थानकातील एका थांबलेल्या शिवशाही बसमध्ये...
स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल
पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...
गडचिरोलीच्या औद्योगिक वाटचालीला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’च्या विविध प्रकल्पांचे कोनसरी येथे उद्घाटन
गडचिरोली | राज्यातील मागास व आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये औद्योगिकीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड'च्या विविध औद्योगिक प्रकल्पांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रकल्पांतून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आर्थिक घडी मजबूत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. लोखंड, ऊर्जा, प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील या महत्त्वाकांक्षी...









