गुन्हेगारी
नवलाख उंबरातील बैलगाडी शर्यतीच्या शौकिनाची भीषण हत्या: अपहरण, खून, जळीतकांड; भाडेकरूला अटक, पोलीस शोध घेत आहेत सहकाऱ्याचा!
भीषण घटना: मावळ तालुक्यातील नवलाख उंबर येथील बैलगाडी शर्यतीच्या शौकिन, पंडित रामचंद्र जाधव (वय 52) यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या 23 वर्षीय भाडेकरूने त्यांचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे शरीर खेड तालुक्यातील वाहागाव येथे जाळले. घटनेचा तपशील: अपहरण: जाधव यांचे 14 नोव्हेंबर रोजी अपहरण झाले. खून: भाडेकरू सुरज वानखेडे व...
पुण्यात अंमली पदार्थांवर मोठी कारवाई : खराडी परिसरातून २७ ग्रॅम एमडी जप्त, दोन जणांना अटक; १२.४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : पुणे शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खराडी परिसरातून मेफेड्रॉन (एम.डी.) या घातक अमली पदार्थासह दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे. पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत तब्बल १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफियांवर मोठा आघात केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे अधिकारी...
अवैध दारू वाहतूक प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई, २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हेगारीवर कठोर कारवाई – अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू! लोणी काळभोर, पुणे – पुणे शहरात अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली असून, लोणी काळभोर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करत २.७८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा....
स्वारगेट व पुणे स्टेशन परिसरातील प्रवाशांचे मोबाईल चोरणारे दोन चोरटे जेरबंद; १२ मोबाईलसह १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे (स्वारगेट) – प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्वारगेट पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे एकूण १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, जप्त मोबाईल्सची एकूण किंमत अंदाजे १,८०,०००/- रुपये आहे. स्वारगेट एस.टी. स्टँड, पीएमपीएमएल बस थांबा, पुणे रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर परिसरात गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोबाईल चोरी जाण्याच्या घटना...
व्हिडिओ: डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबार; सुरक्षा दल, स्नायपर्स कारवाई.
डोनाल्ड ट्रम्प रॅली शूटिंग: सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी गोळीबाराच्या आवाजावर त्वरित प्रतिक्रिया दिली, रिपब्लिकन उमेदवाराला मंचावरून सुरक्षितपणे बाहेर नेण्यासाठी त्याला वेढले. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज एका प्रचार रॅलीत गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलाने सांगितले की, या हल्ल्यात अनेक गोळ्या मंचाच्या दिशेने उंचावरून झाडण्यात आल्या होत्या. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात स्नायपर्स आणि सुरक्षा दलाचे...
४९५ किलो तांब्याच्या तारा चोरी प्रकरणातील मोठा खुलासा! लोणी काळभोर पोलिसांची अतुलनीय कारवाई; तीन आरोपी जेरबंद
पुणे | प्रतिनिधी :- हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात घडलेल्या तब्बल ३ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरी प्रकरणाचा लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोध लावून, तीन चोरट्यांना अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. घटना कशी घडली? दि. ६ जून २०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो मौजे थेऊर गावातील जय मल्हार...
मोका गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली जेरबंद; आंबेगाव परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई!
पुणे शहरातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रुपेश राजन केंद्रे (वय १९) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक शिताफीने अटक केली आहे. या आरोपीविरोधात भा.दं.वि कलम 103, 109, 126(2), 352(3)(5), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट, आर्म अॅक्ट 4(25) आणि महत्त्वाचे म्हणजे MCOCA कायद्याच्या...
मुंबईत घडला संतापजनक प्रकार! 12 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; पाच नराधमांना अटक, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता मुंबईत घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नुकतेच पुण्यातील स्वारगेट आगारात घडलेले प्रकार ताजे असतानाच आता मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे 12 वर्षीय शाळकरी मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय...
“IPS सत्यसाई कार्तिक यांची ‘अमली पदार्थ विक्रेत्यां’विरुद्ध धडाकेबाज कारवाई”
१२ लाख रुपयांचा माल जप्त, ज्यात ३.६ लाख रुपयांचे मेफेड्रोन; चार जणांना अटक. "लोणावळा उपनिरीक्षक सत्यसाई कार्तिकने लोणावळ्याच्या उपनिरीक्षणातील सबडिव्हीजनमध्ये दुष्कारण्यांच्या विरुद्ध कायद्यातील कारवाई घेतल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपासून सत्यसाई कार्तिकने लोणावळ्यात वसलेल्या धुम्रपानाच्या व्यसनाच्या विरुद्धात तरुणांमध्ये जागरूकता सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यातर्फे कायद्यानुसार धुम्रपान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांचा भाग घेतल्यानंतर, पारस्परिक माहितीवर आधारित 09/06/2024 रोजी...
वाघोली पोलिसांची धमाकेदार कारवाई! चैन स्नॅचिंग करणाऱ्या नाशिकच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गंभीर गुन्हे उघडकीस, सोनं, मोबाईल आणि दुचाकी जप्त
पुणे – वाघोली परिसरात नागरिकांच्या गळ्यातील साखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला वाघोली पोलिसांनी अचूक माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करून मोठं यश मिळवलं आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने, मोबाईल फोन आणि दुचाकीचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश: ही कारवाई...















