गुन्हेगारी
‘ऑपरेशन मूनलाईट’ची यशस्वी कामगिरी! लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी सहा महिन्यांनी आरोपीला लावलं गजाआड; खडकी पोलिसांची कौतुकास्पद चौकशी
पुणे : पोलिस यंत्रणेला हादरवून टाकणाऱ्या आणि तपासासाठी अधिकाऱ्यांची झोप उडवणाऱ्या **लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा छडा खडकी पोलिसांनी ‘ऑपरेशन मूनलाईट’**च्या माध्यमातून लावला आहे. गुन्हा गुंतागुंतीचा, साक्ष नसलेला, पीडिता गप्प राहिलेली, आणि आरोपीचा पत्ता सापडत नव्हता... अशा अत्यंत आव्हानात्मक स्थितीत पोलिसांनी आशा न सोडता सखोल तपास केला आणि तब्बल सहा महिन्यांनंतर आरोपीला अटक केली. ही यशस्वी मोहीम केवळ पोलिस यंत्रणेच्या चिकाटीची आणि...
बाणेरमध्ये मोठी कारवाई! पावणेसहा लाख रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ जप्त; शिक्षित तरुण अटकेत
पुणे शहराच्या बाणेर भागात एक धक्कादायक आणि गंभीर अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५,५६,४००/- रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ (Ozokush Ganja) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली असून, यामध्ये अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगाव, बाणेर) या तरुणाला...
आंदेकर टोळीवर पुणे गुन्हे शाखेचा मोठा प्रहार; फरार आरोपी अटकेत, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे गुन्हे शाखेने आंदेकर टोळीविरोधात जोरदार आणि निर्णायक कारवाई करत गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली आहे. खंडणी, शस्त्रसाठा आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करत खंडणीविरोधी पथक १ व २ तसेच गुन्हे शाखा युनिट–१ यांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. फरासखाना पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. १४९/२०२४ अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत!
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी यशस्वी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापासून बचाव झाला आहे. दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील पोलीस...
आझाद चौकात भीषण आग; १० हून अधिक दुकानं खाक, लाखोंचं नुकसान
छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौक परिसरात रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १० हून अधिक दुकानं जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीनं व्यापारी वर्ग हतबल रात्री उशिरा आझाद चौक परिसरात अचानक धुराचे लोट दिसू लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. दुकानांमध्ये असलेला कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आणि...
हडपसर पोलिसांची प्रभावी कारवाई – १२ तासांत अपहरणाची यशस्वी उकल, तीन आरोपी गजाआड!
पुणे शहरात हडपसर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अपहरणाची उकल करत तिन्ही आरोपींना जेरबंद केले असून, अपहृत इसमाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले आहे. हा प्रकार एका तरुणीच्या प्रेमसंबंधांवरून घडला असून, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अपहरणाची पार्श्वभूमी – कुटुंबातील वादातून घटना मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी वाघोलीतील एका मुलीच्या प्रेमात होता. मात्र, तिच्या कुटुंबीयांना हे संबंध मान्य...
कुणाल कामराला त्याची जागा दाखवत शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल!
मुंबई – विनोदी कलाकार आणि स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी त्याचे वक्तव्य थेट शिवसेनेच्या रडारवर आले असून, पक्षाने त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची जागा दाखवली आहे. शिवसेनेने ठाम शब्दांत स्पष्ट केले आहे की, "महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सत्ताधाऱ्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही." शिवसेनेची कडक भूमिका – महाराष्ट्रद्रोही वक्तव्यांना थारा नाही! कुणाल कामरा...
पर्वती पोलिसांची मोठी कामगिरी; पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालत पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपीस अटक करून तब्बल १४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना कडक इशारा मिळाला आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा...
जुन्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत आरोपी जेरबंद
पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणाचा छडा लावत येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत, येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी एक धक्कादायक घटना घडली.आकाश कृष्णा...
“चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या नेत्यावर आंध्र प्रदेशात चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला, मृत्यू”
गौरिनाथ चौधरी, स्थानिक टीडीपी नेते, यांची आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील एका गावात चाकू आणि कुऱ्हाडीने निर्दयपणे हल्ला करून हत्या करण्यात आली, असा आरोप वायएसआरसीपी कार्यकर्त्यांवर आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) नेते गौरिनाथ चौधरी यांची विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी)च्या कार्यकर्त्यांनी चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केली. हा हल्ला बोम्मिरेड्डीपल्ले गावात झाला, जिथे हल्लेखोरांचे नेतृत्व वायएसआरसीपी...









