गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 41

मुंबई पोलिसांनी ४०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील व्यक्तीला अटक केली

0

आशीष दिनेश कुमार शाह याने महाराष्ट्र आणि तमिळनाडूसह अनेक राज्यांतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप; फसवणुकीची रक्कम अनेक कोटींमध्ये असण्याची शक्यता. मुंबई पोलिसांनी ४०० हून अधिक गुंतवणूकदारांना फसवणुकीच्या आरोपावरून मध्य प्रदेशातील आशीष दिनेश कुमार शाहला अटक केली आहे. ४४ वर्षीय आशीष शाहने २०२२ मध्ये समर्याश ट्रेडिंग कंपनी नावाची फर्म सुरू केली आणि मुंबईच्या वर्सोवामध्ये कार्यालय उघडले. शाहने लोकांना सांगितले की तो SEBI...

गडचिरोलीतील माओवाद्यांवर भीतीचा धाक निर्माण करणारे रियल हिरो मा. API सदाशिव देशमुख सरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

0

गडचिरोली | १० जून २०२५माओवाद्यांच्या अड्ड्यावर थेट धडक देऊन अनेक निरपराधांचे प्राण वाचवणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात प्रेरणास्त्रोत ठरलेले मा. API सदाशिव देशमुख सर यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शौर्याचा इतिहास: देशमुख सरांनी आजवर १५ माओवाद्यांचा एन्काउंटर, ११ जणांना आत्मसमर्पण, तर ५ माओवादी दहशतवाद्यांना शस्त्रासह अटक करून...

पुण्यात भरधाव कारने घेतला तरुणाचा बळी – चालक अपघातस्थळी न थांबता पसार!

0

📍 पुणे :- पुणे शहरात पुन्हा एकदा बेफिकीर वाहनचालकाचा बळी गेला आहे. कर्वे रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आणि घटनास्थळी न थांबता पळ काढला. या धक्कादायक घटनेत विनायक साहेबराव थेटे (वय ३०, रा. कोल्हार भगवतीपूर, ता. रहाता, जि. अहील्यानगर) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राहुल थेटे (वय ३४, रा. रहाटणी, पुणे) याच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात...

स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे पोलिसांना सन्मान – ‘पोलीस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ जाहीर

0

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील विविध पोलीस दलातील धाडसी आणि प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘पोलीस पदक फॉर मेरिटोरियस सर्व्हिस’ जाहीर केले आहे. या यादीत पुणे शहर पोलिसांचा ठसा उमटला असून, पोलीस दलातील निष्ठा, कार्यतत्परता आणि धाडस दाखवणाऱ्या अनेकांना हा सन्मान मिळाला आहे. या पदकासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट यश मिळवले आहे. गुन्हे उकलण्यात तांत्रिक...

उल्हासनगर डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेचा मोठा छापा! २४ बारबालांसह ७ ग्राहक आणि ६ कर्मचाऱ्यांना अटक, शहरात खळबळ

0

उल्हासनगर (ठाणे) – उल्हासनगर शहरातील एका प्रसिद्ध डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा धडक कारवाई केली. या कारवाईत २४ बारबाला, ७ ग्राहक आणि ६ बार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. गुप्त माहितीवरून मोठी धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने डान्सबारवर नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या...

दुध टाकण्याच्या बहाण्याने उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी; विमानतळ पोलिसांची सतर्क कारवाई, चोरटा जेरबंद

0

पुणे शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विमानतळ पोलिसांनी अत्यंत चोख आणि तांत्रिक तपास करत दुध टाकण्याच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे. न्यु एअरपोर्ट रोडवरील ‘अॅमिनन्स बाय नाईकनवरे’ या नामांकित सोसायटीत राहणारे नागरिक सूर्यनारायण राजरतिलम यांच्या घरातून दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1 लाख 32 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार विमानतळ पोलीस...

मुंबईत देहविक्रीचा गोरखधंदा उघड; चार ‘स्ट्रगलिंग’ अभिनेत्रींची सुटका

0

मुंबई : मुंबई पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत पवईतील एका हॉटेलमधून देहविक्रीचा गोरखधंदा उघडकीस आणला असून चार 'स्ट्रगलिंग' अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात श्यामसुंदर अरोरा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कसा उघडकीस आला प्रकार? पवई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी हॉटेलवर छापा मारला. छाप्यादरम्यान पोलिसांनी अरोराला रंगेहाथ पकडले. या व्यक्तीवर महिलांना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. चार अभिनेत्रींची...

भूतपूर्व भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांना ED ने बेटिंग प्रकरणात तपासासाठी बोलावले.

0

नवी दिल्ली: भूतपूर्व भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांना प्रवर्तन निदेशालयाने (ED) बेकायदेशीर बेटिंग ॲप्सशी असलेल्या संबंधांवर चौकशी करण्यासाठी बुधवारी (१३ ऑगस्ट) दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानुसार, ED ला अंदाज आहे की रैना यांनी 1xBet या बेटिंग ॲपच्या प्रचारासाठी मोठी रक्कम घेतली असावी आणि त्यांचा या गैरकायदेशीर उद्योगाशी संबंध असू शकतो. चौकशीची पार्श्वभूमी: ED ने परिमॅच आणि 1xBet सारख्या बेटिंग ॲप्सविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी...

लोहगावमध्ये टोळक्याचा हैदोस; १० वाहनांची तोडफोड, तिघांवर कोयत्याने हल्ला, एकाला अटक.

0

पुणे : वैमनस्यातून लोहगाव परिसरात एका टोळक्याने हैदोस घालत तब्बल १० वाहनांची तोडफोड केली आणि तिघांवर कोयत्याने हल्ला करत खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. प्रकरणाचा तपशील: जाधवनगर, विश्रांतवाडी येथील रहिवासी संदीप नंदकुमार आढाव (वय ३५), सलीम बागवान आणि त्यांचा मुलगा अदियान हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. आढाव...

आ. योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण करून खून; यवत परिसरात मृतदेह आढळला, पुण्यात खळबळ.

0

पुणे – विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा सोमवारी सकाळी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी फिरायला गेलेल्या सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून अपहरण करण्यात आले आणि सायंकाळी त्यांचा मृतदेह यवत परिसरात आढळून आला. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सतीश सतबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा, शिवारवाडी) असे अपहरण करून खून...

Copyright ©