महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: ‘महालयुती’ला स्पष्ट बहुमताचा अंदाज, मविआसाठी आव्हानात्मक परिस्थिती – एक्झिट पोल अंदाज.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या एक्झिट पोल्सनुसार भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महालयुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या अंदाजांबाबत आपली नाराजी व्यक्त केली असून, पूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील अनेक वेळा हे अंदाज चुकीचे ठरले आहेत. महत्त्वाचे एक्झिट पोल अंदाज: १. मॅट्रिझ (Matrize) महालयुती: १५०-१७० जागा (४८% मतदान). मविआ (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ):...
शरद पवार यांचे फडणवीस यांना परखड उत्तर: ‘लोकशाहीचे रक्षण करणे म्हणजे चुकीचे कसे?’
सोलापूर: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही प्रक्रियेच्या स्वच्छतेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिल्यानंतर पवार यांनी त्यांना परखड उत्तर देत लोकशाही टिकवण्यासाठी जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका मारकडवाडी येथील ग्रामसभेत बोलताना...
मतदार यादीवरील हरकती व सूचनांची प्रक्रिया चोखपणे पार पाडा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे निर्देश
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक...
भारताचे अर्थक्रांतीचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.
नवी दिल्ली – भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांचे दीर्घ आजारानंतर गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉ. सिंग यांच्या निधनाने देशात शोककळा डॉ. सिंग यांना गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध झाल्यानंतर...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलमध्ये गोळीबार; एक जण अटकेत.
पिंपरी-चिंचवड: काल रात्री ८:४५ वाजता काळेवाडी येथील राहुल बार आणि खुशबू रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा गोळीबार माजी नगरसेवक विनोद नाधे यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासाअंती समजले की, गुरुवारी रात्री आरोपी सचिन दत्तू नाधे, सचिन नाधे, माजी नगरसेवक विनोद नाधे, तुकाराम नाधे आणि माऊली नाधे हे सर्व हॉटेलच्या पहिल्या...
पिंपरी चिंचवड शहरातील २७ विसर्जन घाटांवर जीव रक्षकांची नियुक्ती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून हा उत्सव ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात विसर्जन घाटांवर होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता , दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यापक नियोजन केले आहे....
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन: झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने मोठं पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन ही केवळ एक योजना नसून राज्य शासनाने झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश विकास...
महिला अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे प्रशिक्षण..
पिंपरी, दि.२3 जानेवारी २०२५ – कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ...
“आता थांबायची वेळ संपली आहे, बदल घडवण्याची वेळ आली आहे!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे भावनिक आवाहन
प्रभाग क्रमांक २५ (क) मधील प्रचार सभेत अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. “आज मी तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही, तर तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतःची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: मुंबईत मतदार टक्केवारी वाढवण्यासाठी BMC ची मतदारमित्र पावले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) मतदार सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर सोयी-सुविधा पुरवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतील कमी मतदानाच्या पार्श्वभूमीवर यंदा या निवडणुकीत मतदारांचा अनुभव सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांसाठी खास सोयी-सुविधा: बैठकीच्या सोयी: मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय: शुद्ध आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले...
















