सेव्हन लव्ह्ज चौक परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाईची तयारी; अतिरिक्त महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष पाहणी
शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. पृथ्वीराज बी. पी. यांनी आज सेव्हन लव्ह्ज चौक, शंकरशेठ रोड येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक सभासद श्री. प्रसन्नजीत वैरागे हेही उपस्थित होते. परिसरातील पदपथांवर आणि सार्वजनिक जागांवर झालेल्या अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणाची नोंद...
कर्तृत्वाचा गौरव आणि अभिमानाचा क्षण: गुन्हे शाखेत पदोन्नतीचा सोहळा, ‘पाइपिंग सेरेमनी’त कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मान
मुंबई | प्रतिनिधी पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सेवेचा गौरव करत आज गुन्हे शाखेतील तीन पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार पदावर, तर एका पोलीस हवालदारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती देण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाइपिंग सेरेमनी’ कार्यक्रमात पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पदचिन्हे प्रदान या सोहळ्यात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे यांच्या...
अजितदादांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी सुरू; केंद्रीय हवाई मंत्री नायडू यांचे स्पष्टीकरण
मुंबई | प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत सखोल, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना पत्र पाठवले होते. या पत्रावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी अपघाताच्या चौकशीबाबत सविस्तर माहिती देत, सर्व नियमांचे पालन करून चौकशी प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय हवाई मंत्रालयाने...
“जनतेच्या कराचा पैसा कुणाची जहागिरी नाही”; अनुदानाचा अपहार करणाऱ्यांवर व्याजासह वसुलीची कारवाई
गावाच्या विकासासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान आणि जनतेच्या करातून उभा राहणारा निधी हा कुणाच्याही वैयक्तिक मालकीचा नसून तो सार्वजनिक हितासाठीच वापरला गेला पाहिजे, असा ठाम इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. विकासकामांच्या नावाखाली निधीचा अपव्यय किंवा अपहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि गैरवापर केलेली रक्कम व्याजासहित वसूल केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. अलिकडील आढाव्यात काही ठिकाणी विकासनिधीचा अपुरा वापर, नियमबाह्य...
वाघोलीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; २३ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले असून, त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. दि. १३ जानेवारी २०२६ रोजी तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना वाघोली ते केसनंद मार्गावरून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. वाघोलीकडून येणाऱ्या...
नाशिकमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन; राष्ट्रप्रेमाची स्फूर्ती देणारा भव्य उपक्रम
नाशिक | प्रतिनिधी नाशिक शहरात राष्ट्रप्रेमाचा जागर करणारा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम साकारला गेला. झेप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आर.पी. विद्यालय, नाशिक येथे तब्बल ३१ हजार शाळकरी विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन मोठ्या उत्साहात पार पडले. या भव्य कार्यक्रमाला राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. हजारो विद्यार्थी एकाच सुरात राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन...
नागरिकांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांचे पोलिओ लसीकरण करून घेण्याचे वैद्यकीय विभागातर्फे आवाहन
पिंपरी, दि. २४ जून २०२६: जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, त्याअनुषंगाने देशात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत. ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना व सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती... शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
रस्त्याच्या कडेला उभा होता मेफेड्रोन विक्रेता; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ₹३.७८ लाखांच्या मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एक जण अटकेत घेतला आहे. या कारवाईमुळे रस्त्याच्या कडेला उभा राहून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. दिनांक ३० जून २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, रास्ता पेठेतील उंटाडया मारुती...
ग्रेटर नोएडा येथे ‘KDSG सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल’चे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवी दिशा
ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेश राज्यात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ग्रेटर नोएडा येथे अत्याधुनिक KDSG Super Speciality Hospital चे लोकार्पण उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ, उद्योजक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘नया उत्तर प्रदेश’ या विकासाभिमुख संकल्पनेतून राज्यात आरोग्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात...
“पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मास्टर स्ट्राईक! सराईत घरफोडेखोर जेरबंद — ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्यभरातील ६० गुन्ह्यांची उकल”**
पिंपरी-चिंचवड : शहर आणि उपनगरांमध्ये बंद घरांची रेकी करून घरफोड्या करणाऱ्या कुख्यात टोळीचा प्रमुख धनंजय हरीश काळे (वय 29) याला अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. ही कारवाई झाल्यानंतर गुन्हे शाखेने शहरातील अनेक प्रलंबित घरफोडी प्रकरणांची उकल करण्यात यश...









