महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 240

पुणे जिल्ह्यात ग्रामीण सत्तेसाठी चुरस; जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात, सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर

0

पुणे : तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी आज (९ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सुरू झाली असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. पुणे विभागासह अनेक भागांत २०१७ नंतर प्रथमच या निवडणुका होत...

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही...

मिडनाईट पवना लेक कॉटेज – निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा अनुभव, ग्रीष्मकालीन सुट्टीसाठी परिपूर्ण ठिकाण!

0
Midnight Resort

"मिडनाईट पवना लेक कॉटेज" – निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा श्वास घ्या!पवना लेकच्या कुशीत अनुभव घ्या विश्रांती, निसर्ग, आणि निवांत क्षणांचा! तुमचं सिटी लाईफमधलं गडबडीतलं जीवन थोडं बाजूला ठेवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवा – तेही मिडनाईट पवना लेक कॉटेजमध्ये! पवना लेकच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेलं हे कॉटेज म्हणजे शांतता, सौंदर्य आणि सुखद वास्तव्य यांचा परिपूर्ण संगम! प्रमुख वैशिष्ट्ये: 🌊 दृश्य सौंदर्य:पवना लेकच्या दरीतून...

भवानी पेठ पोलिस ठाण्याच्या कारवाईत तब्बल १९ आरोपी जेरबंद – अंमली पदार्थ, गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा

0

पुणे शहर पोलिसांनी भवानी पेठ परिसरात मोठी कारवाई करत तब्बल १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत विविध प्रकारचे अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४२/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. भवानी पेठ हे क्षेत्र पूर्वीपासून गुन्हेगारी, मादक पदार्थ आणि अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध मानले जात होते....

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा

0

पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना श्रद्धांजली: महाराष्ट्राने गमावला एक चिंतनशील साहित्यिक

0

मुंबई, दि. २५: महाराष्ट्राच्या वैचारिक आणि साहित्यिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने राज्याने एक विचारवंत आणि साहित्यिक स्तंभ गमावला आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, वैचारिक, आणि साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शोकसंदेशाद्वारे केले आहे. न्या. चपळगावकर यांचे कर्तृत्व आणि योगदान अविस्मरणीय आहे. स्वातंत्र्य संग्राम आणि हैद्राबाद...

शहरातील कुख्यात टोळीप्रमुख टिपू सतार टोळीचा पर्दाफाश, महिलांपासून वसुलीसाठी गंडवणुकीचा प्रयत्न, शेवटी पोलिसांची कारवाई

0

पुणे | दिनांक १७ जून २०२५ :- पुणे शहरातील हडपसर, सय्यदनगर आणि कालेबोळ परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे. टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ "टिपू सतार पठाण" याने सात ते आठ जणांच्या साथीने पुण्यात गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. नागरिकांवर दबाव टाकून जमिनी, मालमत्ता, वसुलीचे प्रकार घडवले जात होते. या टोळीने एका महिलेकडून २० लाखांची मागणी...

साश्रू नयनांनी महाराष्ट्राने दिला अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

0

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता झंझावात, जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडलेल्या या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाचे मन गहिवरून आले होते. अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच परिसरात एकच शांतता पसरली. परवा सायंकाळपर्यंत...

“एचआयव्हीचा धोका! मुंबईत वेश्याव्यवसायात अडकलेल्या बांगलादेशी महिलांमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ”

0

मुंबई | दिनांक: २८ जून २०२५ :- मुंबई शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेश्याव्यवसायात जबरदस्तीने अडकवलेल्या ७ बांगलादेशी महिलांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने, आरोग्य व कायदा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत १४ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यातील निम्म्याहून अधिक महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मानव तस्करीचा...

भांडुप पूर्व – पश्चिम जोडणीसाठी महत्त्वाचा टप्पा : भांडुप रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल प्रकल्पाची गती वाढविण्याचे निर्देश

0

भांडुप परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्गावरील उड्डाणपूल (Road Over Bridge - ROB) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष प्रकल्प कार्यस्थळी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा...

Copyright ©