महाराष्ट्र
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून शिगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावकडे ४ नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार
पुणे | १६ जुलै २०२५ – पुणेकर प्रवाशांसाठी एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने पुण्यातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या नवीन गाड्यांमुळे पुणे आता शिगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव यांसारख्या महत्त्वाच्या शहरांशी थेट आणि वेगवानपणे जोडले जाणार आहे. प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायक ▪️ आतापर्यंत पुणे–कोल्हापूर आणि पुणे–हुबळी या दोन मार्गांवर वंदे भारत...
पाहुणचारासाठी गेले आणि मृतदेहात परतले; एका बहिणीचा करुण हंबरडा – ‘सर्व काही उद्ध्वस्त झालं, आता जगायचं तरी कसं?’
मुंबई - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील अतुल माने, संजय लक्ष्मण लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजश्री अकुल या मयत अतुल माने यांच्या पत्नीच्या बहिणीने दिलेल्या माहितीने संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून सोडलं आहे. "ते त्यांच्या पोटात, डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडत होते – माझ्या बहिणीच्या डोळ्यांसमोर!" राजश्री...
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी चमत्कार ठरणार! देशातील सर्वात लांब बोगदा आणि सर्वात उंच पूल महाराष्ट्रात; मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरवोद्गार
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उभारण्यात येणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणारा नसून तो भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रात एक अद्वितीय चमत्कार ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई प्रवासाचा कालावधी जवळपास अर्धा तासाने कमी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाची पाहणी नुकतीच पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग...
पुणे जिल्ह्यात मोसमात पर्यटकांमध्ये धोकादायक प्रवास सुरूच – कमी देखरेखीतील रमणीय स्थळांमध्ये वाढले ‘रिस्की आउटिंग्स’
पुणे | विशेष प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यातील परवडणार्या आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांवर नियन्त्रण कमी झाल्याने, मोसमाच्या सुरुवातीपासून पर्यटकांच्या धोकादायक प्रवासांमध्ये वाढ झाली आहे. खास करून कुंड माळा इंद्रायणी नदी जवळील पुल कोसळल्यामुळे दोन मृत्यू आणि अनेक जखमी झाल्याने या समस्येचे गांभीर्य उघड झाले आहे . धोकादायक स्थळांवर आधारित प्रमुख धोक्यांसाठीचे काही मुख्य निरीक्षणे: लोनावळा, ताम्हिणी घाट, खरडापेठ, बोअर, पासनेत, वरसगाव,...
माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी; प्रशासनाने परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, गावात संचारबंदी लागू.
सोलापूर, मरकडवाडी: माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रणालीवर अविश्वास व्यक्त करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीस नकार दिल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गावात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आणि कायदा...
मुंबई: पोलीस शिपायाने पोस्टल मतदार चिठ्ठीचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले; निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धक्का.
मुंबई : निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला धक्का देणाऱ्या एका प्रकरणात, मुंबईतील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्र पोलीस विभागातील पोलीस शिपाई गणेश शिंदे याने पोस्टल मतदार चिठ्ठीचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: गणेश शिंदे, बीड जिल्ह्यातील अस्ती मतदारसंघाचा मतदार असून, मुंबईतील ताडदेव येथील...
मराठा आरक्षण लढ्याला नवी ऊर्जा – अंतरवली सराठी येथे छत्रपती शिवरायांचा रथ दाखल, २९ ऑगस्टला मुंबई वारीत पेटणार क्रांतीची ज्योत
जालना / अंतरवली सराठी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला ऐतिहासिक उर्जा मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ सोमवारी अंतरवली सराठी येथे दाखल होताच संपूर्ण परिसरात जल्लोष उसळला. हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमले आणि आंदोलनाला नवा जोम मिळाला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या चळवळीला रथाच्या आगमनामुळे ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभल्याचे मानले जात आहे. “हा रथ म्हणजे केवळ प्रतिक नाही,...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जुलै २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ३८ जण सेवानिवृत्त…
पिंपरी, दि. २ ऑगस्ट :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी हे पुढील जीवनात वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार आहेत. त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणी सेवानिवृत्तीनंतरही कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,पिंपरी...
“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...
पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे
नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...












