महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा संपन्न
मुंबई | २६ जानेवारी २०२६भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दिमाखदार आणि राष्ट्राभिमान जागवणारा शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सकाळी ठीक ९.१५ वाजता शिवाजी पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोलीस दल, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन...
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा; आयुक्त यांचे निर्देश
पिंपरी - येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच पूरप्रवण भागांतील नागरिकांच्या स्थलांतराचे पुर्वनियोजन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. पिंपरी चिंचवड...
प्रभाग २४ मध्ये कमळाचा जल्लोष; जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने, चारही उमेदवारांचा दणदणीत विजय
पुणे | प्रतिनिधी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू रुग्णालय – के. ई. एम. हॉस्पिटल परिसर) मधून भारतीय जनता पक्षाने यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असलेले भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, “कौल जनतेचा, विजय कमळाचा” हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या...
एकता नगरातील मुख्य गटार लाईनची तातडीने साफसफाई; नागरिकांना दिलासा
एकता नगर परिसरातील मुख्य गटार लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात माती, कचरा आणि दगड साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला होता. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा मंदावून काही ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्यात आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून विशेष यंत्रसामग्रीच्या साहाय्याने गटार लाईनमधील साचलेला गाळ, कचरा व दगड काढून टाकले....
पुणे शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ चे आयोजन; वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांचा पुढाकार
पुणे शहरात सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे शहर वाहतूक विभागातर्फे “रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ व मुद्देमाल वितरण समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या वतीने आयोजित या...
अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी शरद पवार विद्या प्रतिष्ठान मैदानावर दाखल
बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरवणाऱ्या घटनेनंतर आज बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संस्कारासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर दाखल झाले. आपल्या पुतण्याला अखेरचा निरोप देताना शरद पवार भावुक झाल्याचे दृश्य उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेले. विद्या प्रतिष्ठान मैदान परिसरात सकाळपासूनच प्रचंड गर्दी जमली असून, राज्यभरातून नेते,...
माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी
मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...
केएसबी लिमिटेडची तिसऱ्या तिमाहीत दमदार झेप; नव्या प्रकल्पांच्या जोरावर मजबूत आर्थिक कामगिरी
पुणे : जागतिक पातळीवर पंप आणि वाल्व निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या केएसबी लिमिटेडने जुलै ते सप्टेंबर 2025 या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अत्यंत प्रभावी आर्थिक वाढ नोंदवली आहे. विविध देशांत मिळालेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे, तांत्रिक नवकल्पनांमुळे आणि मजबूत ग्राहकविश्वासामुळे या तिमाहीत कंपनीची कामगिरी आणखी भक्कम झाल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे विक्री उत्पन्न सातत्याने वाढत असून, जागतिक आव्हानात्मक बाजारस्थितीतही केएसबीने उल्लेखनीय कामगिरी...
पुण्यात अवैध गावठी दारू वाहतूक करणाऱ्या टोळीवर वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; ११५० लिटर दारू जप्त, दोन आरोपी अटकेत
पुणे | प्रतिनिधी :होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैध गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २ मार्च २०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत...
डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब’ यांचे नाव द्यावे; पिंपरीतील राष्ट्रवादी नगरसेवकांची जोरदार मागणी
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी ठाम आणि भावनिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका...









