Home Breaking News “शिंदे यांची बलात्काराच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया”

“शिंदे यांची बलात्काराच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया”

62
0

अँड. किशोर नानासाहेब शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि म.न.से. जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष, यांनी आज एका महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर विभागाने या घटनेची अधिकृत माहिती घेतली. अँड. शिंदे यांनी कडक कारवाईची मागणी करताना स्पष्ट केले की, पुण्यात अशा घटनांना थारा दिला जाणार नाही.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडलेल्या या घटनेने लोकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण केली आहे. त्यांनी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे म्हटले आणि अशा गंभीर घटनांवर तातडीने व कठोरपणे कारवाई करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पीडित तरुणीला न्याय मिळवण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

Previous article“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे कार्य महापालिका आणि स्थायी समितीसंबंधित विविध कार्ये समाविष्ट , स्थायी समिती आणि महापालिका सभा”
Next articleइंस्टाग्रामद्वारे ओळख करून पुण्यात कॉलेज मुलीवर चार तरुणांनी केले बलात्कार! आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश.
दर्जेदरनामा डिजिटल न्यूज चॅनल हा आधुनिक बातम्या प्लेटफॉर्म आहे ज्याच्या मुख्य धोरण जगातल्या ताज्या बातम्यांची आणि सूक्ष्मविश्लेषणांची देणगी आहे. त्याच्या समर्पणात वास्तविक रिपोर्टिंग आणि गहन कवरेजवर बल देता, दर्जेदरनामा ह्या चॅनलची उपस्थिती जागतिक घटनांवर, राजकीय घटनांवर, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, आणि इतर विविध विषयांवर ठराव ठेवते. या चॅनलचा उपयोग करून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना वास्तविक वेळेवर अद्यावत आणि बहुमुखी पात्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृढ टीम बातम्यापत्रकारांच्या आणि संवाददात्यांच्या समर्पणाच्या माध्यमातून, दर्जेदरनामा बातम्यापत्रकारीता पत्रकारितेच्या उच्चतम मानकांची रक्षा करतो आणि त्याच्या कामाच्या उच्च मानकांसोबत कड़ी संबंध साधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here